शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : घरातून बेपत्ता झालेल्या युवकाचा खून,  संशयित पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 16:10 IST

नवीन कवठे, ता. कऱ्हाड येथून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या युवकाचा खून झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी एका संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देघरातून बेपत्ता झालेल्या युवकाचा खून,  संशयित पोलिसांच्या ताब्यातभुयाचीवाडी येथे बंधाऱ्याच्या डोहात आढळला मृतदेह

उंब्रज : नवीन कवठे, ता. कऱ्हाड येथून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या युवकाचा खून झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी एका संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संशयिताने बंधाऱ्याच्या डोहात मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बंधाऱ्यातील डोहातून मृतदेह बाहेर काढण्यात आला.वैभव आनंदराव घाडगे (वय २८) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कवठे येथील वैभव घाडगे हा युवक रविवार, दि. २५ रोजी रात्री जेवण करण्यास परत येतो, असे सांगून घरातून निघून गेला. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत परत आला नाही.

वैभव त्याच्या मित्रांकडे गेला असावा, असे समजून कुटुंबीयांनी उशिरापर्यंत त्याची वाट पाहिली. तसेच त्याच्या मित्रांशीही संपर्क करण्यात आला. गावाच्या परिसरातही त्याला शोधण्यात आले. नातेवाइकांनी शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा न लागल्यामुळे याबाबतची फिर्याद शुक्रवारी उंब्रज पोलीस ठाण्यात देण्यात आली.हा प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे उंब्रज पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. रात्री उशिरापर्यंत पोलीस याप्रकरणी अनेकांकडे चौकशी करीत होते. त्यातून एका संशयिताचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली देत वैभवचा खून केल्याचे सांगितले.

तसेच भुयाचीवाडी येथील डोहात मृतदेह टाकल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस पथक शनिवारी सकाळीच भुयाचीवाडी बंधाऱ्याजवळ पोहोचले. त्याठिकाणी स्थानिक पाणबुड्यांच्या साह्याने शोध घेण्यात आला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात यश आले. वैभवच्या खुनाच्या कारणाचा पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर