शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा नगरपालिका : रस्त्यावर कचरा.. आॅन दि स्पॉट दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 14:45 IST

घंटागाडीऐवजी सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर कचरा टाकून शहराचे सौंदर्य बकाल करणाऱ्यांवर आता आॅन दि स्पॉट कारवाई सुरू करण्यात आली आहे. सातारा पालिकेने दोन दिवसांत सहाजणांवर कारवाई करून प्रत्येकी १८० रुपये दंडही वसूल केला आहे. या कारवाईची नागरिकांनी धास्ती घेतली असून, कारवाई आणखीन तीव्र केली जाणार आहे.

ठळक मुद्देसातारा नगरपालिका : रस्त्यावर कचरा.. आॅन दि स्पॉट दंडदोन दिवसांत सहाजणांवर कारवाई; शहर स्वच्छतेसाठी मोहीम

सातारा : घंटागाडीऐवजी सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर कचरा टाकून शहराचे सौंदर्य बकाल करणाऱ्यांवर आता आॅन दि स्पॉट कारवाई सुरू करण्यात आली आहे. सातारा पालिकेने दोन दिवसांत सहाजणांवर कारवाई करून प्रत्येकी १८० रुपये दंडही वसूल केला आहे. या कारवाईची नागरिकांनी धास्ती घेतली असून, कारवाई आणखीन तीव्र केली जाणार आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. या अभियानांर्तगत सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, कचऱ्यांची ओला व सुका अशी वर्गवारी न करता तो तसाच घंटागाडीत टाकणे, सस्त्यावर थुंकणे, लघुशंका करणे अथवा शौच करणाऱ्या व्यक्तींकडून दंड आकारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने सर्व नगरपालिका व नगरपंचायतींना दिले आहेत.सातारा पालिकेने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. कारवाईच्या पहिल्या दिवशी चिटणीस चौकातील शशिकला घाडगे या महिलेवर तर दुसऱ्या दिवशी इतर पाच जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.संबंधितांकडून जागेवरच १८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील वीस प्रभागांच्या स्वच्छतेची जबाबदारी वीस मुकादमांकडे सोपविण्यात आली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित मुकादमांना पावती पुस्तक देऊन त्यांना कारवाईचे अधिकार दिले आहेत. पालिकेच्या या मोहिमेची नागरिक धास्ती घेऊ लागले असून, याचा चांगला परिणाम शहर स्वच्छतेवर दिसून येणार आहे.सातारा शहरातून दररोज ६० ते ७० टन ओला व सुका कचरा संकलितकेला जातो. ४० घंटागाड्यांच्या माध्यमातून हे काम दररोज सुरू असते. शहर स्वच्छतेसाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात असताना नागरिकांची रस्त्यावर कचरा टाकण्याची मानसिकता मात्र बदलत नाही. कचरा कुंडीच्या जागी अथवा रस्त्यावर येता-जाता कचरा टाकला जातो. त्यामुळे शहराचे सौंदर्य बकाल होत आहे. पालिकेने सुरू केलेल्या या कारवाईमुळे विघ्नसंतोषी नागरिकांवर जरब बसणार आहे. 

पालिकेकडून जनजागृती करूनही काही नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. तर काही ओला व सुका अशी वर्गवारी न करता तो घंटागाडीत टाकतात. अशा कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करताना पालिकेची दमछाक होते. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, शहर स्वच्छ व सुंदर राहावे, यासाठीच दंडात्मक कारवाई हाती घेण्यात आली आहे. पुढे ही मोहीम आणखी प्रभावीपणे राबविली जाईल.- संचित धुमाळ,उपमुख्याधिकारी, सातारा पालिका

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMuncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर