शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

सातारा नगरपालिकेत आता महिलाच कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 19:15 IST

Muncipal Corporation Satara- सातारा पालिकेच्या सभापती निवडी बिनविरोध झाल्या असून, पालिकेचा कारभार आता महिला नगरसेविकांच्या खांद्यावर सोपविण्यात आला आहे. सातारा विकास आघाडीचे प्रमुख खासदार उदयनराजे भोसले यांनी नियोजन, बांधकाम, आरोग्य, महिला बालकल्याण व पाणी पुरवठा सभापतिपदी महिला नगरसेविकांची निवड करून सर्वांना सुखद धक्का दिला. त्यामुळे नगराध्यक्षांसह पालिकेत महिला राज निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देसातारा नगरपालिकेत आता महिलाच कारभारी सभापती निवडी बिनविरोध : राजकीय जबाबदारी पेलण्याचे आव्हान

सातारा : सातारा पालिकेच्या सभापती निवडी बिनविरोध झाल्या असून, पालिकेचा कारभार आता महिला नगरसेविकांच्या खांद्यावर सोपविण्यात आला आहे. सातारा विकास आघाडीचे प्रमुख खासदार उदयनराजे भोसले यांनी नियोजन, बांधकाम, आरोग्य, महिला बालकल्याण व पाणी पुरवठा सभापतिपदी महिला नगरसेविकांची निवड करून सर्वांना सुखद धक्का दिला. त्यामुळे नगराध्यक्षांसह पालिकेत महिला राज निर्माण झाले आहे.आगामी पालिका निवडणुकांचा रंग पाहता शेवटच्या टर्मसाठी उदयनराजे भोसले कोणाला संधी देणार? याची प्रचंड उत्सुकता होती. तर नेहमीच्या धक्कातंत्र शैलीत उदयनराजे यांनी पालिकेतल्या महिला नगरसेवकांवर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले.

विद्यमान आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांचा अपवाद वगळता बांधकाम विभागासाठी सिध्दी पवार, महिला व बाल कल्याण विभागासाठी रजनी जेधे, पाणीपुरवठा विभागासाठी सीता हादगे व नियोजन विभागासाठी स्नेहा नलावडे यांनी सकाळी अकरा वाजता नामनिर्देशन पत्र पीठासन अधिकाऱ्यांकडे दाखल केले. तत्पूर्वी रिक्त जागांची माहिती पालिका सभागृहात आयोजित विशेष सभेमध्ये देण्यात आली.अर्ज माघारीसाठी उमेदवारांना साडेबारा ते पावणे एक या दरम्यान पंधरा मिनिटाची मुदत देण्यात आली. दुपारी एक वाजता पीठासन अधिकाऱ्यांनी पाच विषय समित्यांच्या नूतन सभापतींची घोषणा केली. स्थायी समितीच्या सदस्यपदी निशांत पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे संधी देण्यात आली.

नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी नूतन सभापतींचे कौतुक केले. नगराध्यक्षाच्या साथीला आता सर्वच महिला सभापतींची फळी उभी राहिल्याने सातारा पालिकेत खºया अर्थाने महिलाराज अवतरले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाWomenमहिलाSatara areaसातारा परिसर