शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर सातारा पालिकेची कारवाई , दमदाटी : - एकावर अदखलपात्र गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:28 IST

नळ कनेक्शनला जोडलेली मोटर काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी आनंदराव सोनकर (भूतेबोळ, शनिवार पेठ) यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला

ठळक मुद्देपाणीपुरवठा सभापतींना शिवीगाळ, २२ जणांना नोटीस; चार मोटारीही जप्त यापुढे फौजदारी दाखल करून त्यांचे नळ कनेक्शन कायमस्वरुपी बंद केले जातील.

सातारा : नळ कनेक्शनला जोडलेली मोटर काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी आनंदराव सोनकर (भूतेबोळ, शनिवार पेठ) यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टंचाई काळात पाण्याची नासाडी करणाºया नागरिकांवर अंकुश लावण्यासाठी पालिकेच्या वतीने धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. नगराध्यक्षा माधवी कदम, सभापती श्रीकांत आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळी शहरात ठिकठिकाणी ही मोहीम राबवली. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी पाण्याचा दुरुपयोग करणाºया २२ नागरिकांना जागेवरच कारवाईची नोटीस बजावण्यात आली. तसेच चार इलेक्ट्रिक मोटारी जप्त करून तीन नळकनेक्शनही बंद करण्यात आले.सकाळी सात वाजता बोगदा परिसरातून ही मोहीम सुरू झाली. पाण्याची नासाडी करताना आढळून आलेल्या संबंधित नागरिकांवर जागेवरच कारवाई करण्यात आली. पाणीपुरवठा विभागाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. काही जणांनी कर्मचाऱ्यांची हुज्जतही घातली. बोगदा परिसर, समर्थ मंदिर, भूतेबोळ व राजवाडा परिसरातील पाणी परिस्थितीची पथकाकडून पाहणी करण्यात आली. व्यापारी पेठेतील व्यापाºयांनाही पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या सूचना यावेळी करण्यात आली.

दरम्यान, शनिवार पेठेतील भूतेबोळ येथे राहणाºया आनंदराव सोनकर यांनी नळ कनेक्शनला मोटार लावल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. ही मोटार तत्काळ काढून टाका अन्यथा जप्त केली जाईल, असा इशारा सभापती आंबेकर यांनी दिला. या प्रकारानंतर सोनकर यांनी चिडून जाऊन आंबेकर यांना शिवीगाळ व दमदाटी केली. या घटनेनंतर आंबेकर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून सोनकर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होत. झालेल्या घटनेचा सातारा विकास आघाडीकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.

या मोहिमेत पाणीपुरवठा अभियंता दिग्विजय गाढवे, दीपक गाढवे, नंदकुमार कांबळे, तार्केश्वर बावणे, महेश पवार, संजय घाडगे, सुदाम घाडगे व संतोष घाडगे यांनी सहभाग घेतला.तीन नळ कनेक्शन तोडलीटंचाई काळात पाण्याचा अतिरिक्त वापर करणाºया नागरिकांचे तीन नळ कनेक्शन पाणीपुरवठा विभागाच्या पथकाकडून तातडीने बंद करण्यात आले. उन्हाची तीव्रता वाढत असताना जर कोणी पाण्याची नासाडी करीत असेल, तर याही पुढे संबंधितांचे कनेक्शन बंद केले जातील, असा इशारा पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी दिला आहे. 

पालिकेने सुरू केलेली ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. नळाला मोटारी लावणाºयांविरुद्ध यापुढे फौजदारी दाखल करून त्यांचे नळ कनेक्शन कायमस्वरुपी बंद केले जातील. खासदार उदयनराजे भोसले यांनीही कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.- माधवी कदम,  नगराध्यक्षा. 

खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा विभागाने कारवाई मोहीम हाती घेतली आहे. सातारकर पाण्यापासून वंचित राहू नये, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे कारवाईत कोणाचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही. ही कारवाई अधिक तीव्र केली जाईल.- श्रीकांत आंबेकर,  सभापती, पाणीपुरवठा

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीटंचाई