शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

साताऱ्यात उच्चांकी तापमान, उष्माघाताचा धोका; उकाड्यातच वळीव पावसाचा तडाखा

By नितीन काळेल | Updated: April 19, 2023 19:09 IST

सातारकर उकाड्याने हैराण

सातारा : सातारा शहराचा पारा सतत वाढत असून बुधवारी तर ३९.९ अंशाची नोंद झाली. यावर्षातील हा उच्चांकी पारा ठरला. तर सतत उन्हाची तीव्रता वाढत असल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. दरम्यान, पारा वाढल्याने सातारकर उकाड्याने हैराण झाले. दरम्यानच, सातारा शहर आणि परिसराला सायंकाळच्या सुमारास वळवाच्या पावसाने झोडपून काढल्याने उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात जवळपास पाऊण तास पाऊस पडत होता. यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले, तर रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून ऊन जाणवत आहे. तर मार्च महिन्यात पारा ३७ अंशावर पोहोचला होता. मात्र, अवकाळी पाऊस होत असल्याने त्यावेळी तापमानात उतारही यायचा. परिणामी ऊन आणि उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत नव्हती. मात्र, एप्रिल महिना सुरू झाल्यापासून सूर्य आग ओकू लागल्याचे चित्र आहे. सतत तापमान ३६ अंशावर राहिले आहे. वळवाचा पाऊस झाला की तापमानात उतार येत आहे. पण, उकाडा कायम राहतो. त्यातच मागील तीन दिवसांपासून सातारा शहराचा पारा सतत वाढत चालला आहे. बुधवारी तर शहराचे कमाल तापमान ३९.९ अंश नोंद झाले. हे या वर्षातील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले आहे. सातारा शहराचे तापमान वाढत चालल्याने दुपारच्या सुमारास मुख्य रस्त्यावरही तुरळक वाहने दिसत आहेत. तर बाजारपेठेतील उलाढालही मंदावली आहे. तर उन्हाची तीव्रता असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव या तालुक्यात साताऱ्यापेक्षा अधिक पारा असतो. त्यामुळे बुधवारी या तालुक्यात कमाल तापमानाने ४० अंशाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. तर काही ठिकाणी मजूर सकाळी लवकर कामाला जाऊन दुपारपर्यंत माघारी येत आहेत. मेंढपाळ वर्ग तर दुपारच्या सुमारास झाडाच्या सावलीत थांबणेच पसंद करीत आहे.सातारा शहरात नोंद कमाल तापमान...दि. १० एप्रिल ३७, ११ एप्रिल ३८.१, १२ एप्रिल ३९.३, १३ एप्रिल ३८.३, दि. १४ एप्रिल ३८.२, १५ एप्रिल ३६.२, १६ एप्रिल ३६.१, १७ एप्रिल ३७.४, १८ एप्रिल ३८.८ दि. १९ एप्रिल ३९.९

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमानRainपाऊस