शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : प्रसूतीनंतर बारा तासांत विवाहितेचा मृत्यू, कऱ्हाडातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:13 IST

प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत सोमवारी दुपारी नातेवाइकांसह ग्रामस्थांनी येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या मांडला.

ठळक मुद्देप्रसूतीनंतर बारा तासांत विवाहितेचा मृत्यू, कऱ्हाडातील घटना नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या; हलगर्जीपणाचा आरोप

कऱ्हाड  : प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत सोमवारी दुपारी नातेवाइकांसह ग्रामस्थांनी येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या मांडला.

यावेळी डॉक्टर व नातेवाइकांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला.रविना आकाश माने (वय २१) असे मृत विवाहितेचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विहापूर (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील रविना यांचा कोळे येथील आकाश माने यांच्याशी डिसेंबर २०१६ मध्ये विवाह झाला होता.

रविना या गर्भवती असल्यामुळे गत काही महिन्यांपासून कुटुंबीय त्यांची चांगली काळजी घेत होते. दरम्यान, शनिवारी रात्री प्रसूतीसाठी रविना यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रसूती झाली. त्यांनी मुलीला जन्म दिला.मुलीच्या जन्मामुळे कुटुंबीय आनंदीत असतानाच रविना यांची प्रकृती बिघडली. बाळाची प्रकृती चांगली असतानाही रविना यांची तब्बेत खालावल्यामुळे नातेवाईक घाबरले. त्यानंतर रविना यांना अधिक उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर तेथील डॉक्टरांनी योग्य उपचार आणि देखभाल केली नसल्यामुळे रविना यांचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला. संतप्त नातेवाइकांसह ग्रामस्थ दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. यावेळी शाब्दिक चकमक उडाली.तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने कऱ्हाड शहर तसेच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीही तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे आश्वासन नातेवाइकांना दिले. त्यामुळे तणाव निवळला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हाpregnant womanगर्भवती महिला