शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : मराठीला अभिजात दर्जासाठी ताकद पणाला लावणार : नितीन गडकरी, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 16:22 IST

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी ताकद पणाला लावणार आहे,ह्ण असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.

ठळक मुद्देमराठीला अभिजात दर्जासाठी ताकद पणाला लावणार : नितीन गडकरी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली भेटगडकरींची शिवेंद्रसिंहराजेंसोबत कमराबंद चर्चा

सातारा : मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी ताकद पणाला लावणार आहे, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी चळवळ उभी केली आहे. या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, पुणे प्रतिनिधी राजन लाखे, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, माजी नगरसेवक अविनाश कदम, डॉ. सचिन जाधव, सुरेंद्र वारद आदींनी शुक्रवारी मुंबई येथे मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन सखोल चर्चा केली. तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, असे निवेदन देण्यात आले.मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंबंधीच्या प्रस्तावाबाबतचे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले असून, सांस्कृतिक मंत्रालयाने कृतिशील कार्यवाही सुरू केल्याची माहितील पत्राद्वारे मसापचे जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांना कळवली आहे. यानंतर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. तरी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून २६ जानेवारीपूर्वी यासंदर्भात आश्वासन मिळवून द्यावे, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी मंत्री गडकरी यांच्याकडे केली.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतची कॅबिनेट नोट तयार केल्याचे जाहीर केले होते. मात्र त्याच्यापुढे कार्यवाही झाली नसल्याचे विनोद कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. त्यावर मंत्री गडकरी म्हणाले, आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला, तर माझ्यासाठी अभिमानाचा विषय ठरेल.राज्यातील ११ कोटी जनतेच्या अस्मितेचा हा प्रश्न निकाली काढण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. सर्व कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्या असतील तर पंतप्रधानांकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी नक्की आग्रह धरून त्यांचा होकार घेईन,असे आश्वासन गडकरींनी दिले.गडकरींची शिवेंद्रसिंहराजेंसोबत कमराबंद चर्चामराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी भेटायला आलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर गडकरींनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी कमराबंद चर्चा केली. या चर्चेचा तपशील कळाला नसला तरी या भेटीमुळे सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीliteratureसाहित्यSatara areaसातारा परिसर