शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: एक कोटीच्या मांडुळाची तस्करी; तिघांना अटक, तिघेही आरोपी रायगड जिल्ह्यातील

By दीपक शिंदे | Updated: February 18, 2024 10:43 IST

Satara Crime News: तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची किंमत असलेल्या मांडुळाची तस्करी करणाऱ्या तिघांना तळबीड, ता. कऱ्हाड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मांडूळ हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई दि. १७ रोजी सायंकाळी करण्यात आली.

- दीपक शिंदे सातारा - तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची किंमत असलेल्या मांडुळाची तस्करी करणाऱ्या तिघांना तळबीड, ता. कऱ्हाड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मांडूळ हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई दि. १७ रोजी सायंकाळी करण्यात आली. रूपेश अनिल साने (वय २५, रा. आड, ता. पोलादपूर, जि. रायगड), अनिकेत विजय उत्तेकर (वय २७), आनंद चंद्रकांत निकम (वय ३५, दोघेही रा. कापडखुर्दे, ता. पोलादपूर, जि. रायगड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत तळबीड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तळबीड पोलिस शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड सातारा रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी वराडे या गावामध्ये जय शिवराय या हाॅटेलजवळ काही लोक मांडूळ विक्रीसाठी येणार आहेत, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले आणि पोलिस काॅन्स्टेबल नीलेश विभुते यांना मिळाली. त्यानंतर तळबीड पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तातडीने सापळा लावला. काही वेळातच तेथे तिघेजण दुचाकीवरून तेथे आले. त्यांच्याजवळ एक बाॅक्स होता. त्या बाॅक्सची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये मांडूळ आढळून आले. पोलिसांनी या तिघांकडे कसून चाैकशी केली असता त्यांनी हे मांडूळ आनंद चंद्रकांत निकम यांच्या शेतात काम करीत असताना दहा दिवसांपूर्वी सापडले. या मांडुळाची किंमत एक कोटी १० लाख रुपये ठरली असून, विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी कबूल केले. मात्र, कोणाला विकणार होते, हे अद्याप समोर आले नाही. कऱ्हाड येथील वनक्षेत्रपाल अधिकाऱ्यांकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने जप्त केलेले मांडूळ देण्यात आले आहेेेेे.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले, पोलिस उपनिरीक्षक अशोक मदने, सहायक फाैजदार काळे, खराडे, पोलिस काॅन्स्टेबल आप्पा ओंबासे, संदेश दीक्षित, नीलेश विभुते, सुशांत कुंभार, महेश शिंदे आदींनी या कारवाई भाग घेतला.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर