शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

पृथ्वीराज चव्हाणांसाठी धोक्याची घंटा; 'कराड दक्षिण'ची सेमी फायनल अतुल भोसलेंनी जिंकली

By प्रमोद सुकरे | Updated: June 5, 2024 22:30 IST

काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटलांवर आत्मचिंतनाची वेळ

कराड - नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक म्हणजे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाहिली जात होती. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येकानेच प्रतिष्ठा पणाला लावत काम केले होते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघही त्याला अपवाद नाही. पण काँग्रेस विचारांचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघात प्रथमच भाजपने मताधिक्य घेतल्याने डॉ.अतुल भोसले यांनी विधानसभेची सेमी फायनल जिंकली अशीच चर्चा सुरू झाली आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा यशवंत विचारांचा  किंवा काँग्रेस विचारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आजवर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपची लाट आली तरी या मतदारसंघाने काँग्रेसचाच आमदार निवडून दिला आहे. आजवर येथून दिवंगत यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील -उंडाळकर यांनी नेतृत्व केले. तर सध्या काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नेतृत्व करीत आहेत.

भाजपचे नेते डॉ.अतुल भोसले यांनी यापूर्वी २ वेळा कराड दक्षिणमधून नशीब आजमावले. पण त्यावेळी त्यांना यश आले नाही. मात्र त्यांनी आपली चिकाटी सोडलेली नाही .कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी सातत्याने विकास कामे व समाजकार्याचा धडाका सुरू ठेवला आहे.

नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक त्यांनी विधानसभेची सेमी फायनल म्हणूनच लढली. त्यासाठी अथक परिश्रम घेतले. आणि त्याचेच फलित म्हणून यावेळी ६१६ मतांचे मताधिक्य भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना दिले गेले आहे. या मतांनी उदयनराजे भोसले यांच्या विजयाला हातभार लावला आहेच पण उद्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मार्गावर त्यांनी यशाची बिजे रोवली आहेत असंच म्हटलं तरी वागत ठरणार नाही.

मताधिक्य चर्चेचा विषय

गत लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदार संघातून राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार खासदार श्रीनिवास पाटील यांना सुमारे ३१ हजारांचे मताधिक्य दिले होते. यावेळी कराडचा उमेदवार नसल्याने हे मताधिक्य कमी होईल असा अनेकांचा कयास होता. पण कराड दक्षिणेत भाजप मताधिक्य घेईल असं कोणीही म्हटण्याचं धाडस करत नव्हते. पण डॉ.अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ६१६ मतांची घेतलेले मताधिक्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

त्यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ

कराड दक्षिण हा काँग्रेस विचारांचा मतदारसंघ मानला जातो. येथे काँग्रेस अंतर्गत असणारे दोन परस्परविरोधी गट सर्वश्रुत होते. मात्र अलीकडच्या काही वर्षात हे दोन गट एकत्रित आले आहेत. स्थानिक शिखर संस्थांच्या निवडणुकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण व अँड. उदयसिंह पाटील यांनी एकीचे बळही दाखवून दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस दक्षिणेत मताधिक्य घेणारच  फक्त किती? एवढीच चर्चा होत होती. पण प्रत्यक्षात काँग्रेसची झालेली पिछाडी नेत्यांसह कार्यकर्त्यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी कराड दक्षिण मतदार संघात  ३ लाख ३ हजार ८८० एवढे मतदार होते. पैकी १ लाख ९७ हजार ६९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे सुमारे ६५.२७ टक्के मतदान झाले होते. प्रत्यक्षात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना ९२ हजार ८१४ तर राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना ९२ हजार १९८ एवढी मते मिळाली. तर इतर उमेदवारांना मिळून १३ हजार ६१४ मते मिळाली. यात उदयनराजे भोसले यांना ६१६ मतांचे मताधिक्य मिळाल्याचे स्पष्ट होते.

यापूर्वी नगरपालिकेत फुलले होते कमळ !

खरंतर कराड च्या मातीत यापूर्वी एकदा कमळ फुलले होते. तेही नगरपालिकेच्या निवडणुकीत. सन  २०१६  मध्ये झालेल्या थेट नगराध्यक्षा पदाच्या निवडणुकीत भाजपच्या रोहिणी शिंदे यांनी तिरंगी लढतीत बाजी मारत विजय संपादन केला होता. त्यानंतर आता कराड दक्षिणेत लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मताधिक्य मिळालेले आहे.

 

टॅग्स :satara-pcसाताराPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेAtul Bhosaleअतुल भोसलेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल