शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांनी शिवरायांच्या वंशजांना...'; उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 15:45 IST

Satara Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार जोरदार सुरू आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी दिली आहे.

Satara Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार जोरदार सुरू आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही बाजूंनी प्रचार सुरू असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनीही प्रचार सुरू केला आहे. 

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी विधानसभा मतदारसंघात दौरे वाढवले आहेत. महिलांचे मेळावे सुरू आहेत. काल  कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मेळावा झाला. यावेळी छत्रपती  दमयंतीराजे भोसले यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 

सुनेत्रा हरल्या तर अजित पवारांचे राजकीय अस्तित्व धोक्यात? काय म्हणतायत उपमुख्यमंत्री

"उदयनराजे काँग्रेससोबत असताना काँग्रेसला नेहमी भीती असायची की, उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. हे कुटुंब राजकारणात पुढे आले तर आमचे काय होणार? म्हणून काँग्रेसने उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवले, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी काँग्रेसवर केला. 

दमयंतीराजे भोसले म्हणाल्या, उदयनराजेंनी आतापर्यंत खूप परिश्रम घेतले आहे, त्यांच्यासाठी काही सोपं नव्हते. उदयनराजे राजकारणात पुढे गेले तर कोणी थांबवू शकणार नाही अंस काँग्रेसला वाटायचे, असंही दमयंतीराजे म्हणाल्या. काँग्रेसने त्यांना नेहमी सोबत घेतले पण मागेच ठेवले. आमच्या परिवाराने लोकांसाठीच काम केलं आहे. उदयनराजेंनाही हीच शिकवण आहे, त्यांना तुमची सेवा करायची आहे. उदयनराजेंनी मागच्यावेळी लगेच राजीनामा दिला होता, त्यावेळी मलाही कळालं नव्हतं. मतदारसंघातील कामासाठी त्यांनी पद सोडले.भाजपा एक विकासाचा गट आहे, आता महायुतीमध्येही त्यांना ऑफर होत्या पण त्यांनी भाजपा सोडली नाही. भाजपामधून आपली जास्त काम होतील, असंही दमयंतीराजे भोसले म्हणाल्या. 

मेळाव्यांवर भर..लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले यांनीदेखील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दौरा, बैठकांचा धडाका सुरू केला आहे. मतदारसंघात त्यांनी आतापर्यंत वीस मेळावे घेतले आहेत. महिला व तरुणींशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणीदेखील त्या जाणून घेत आहेत.

टॅग्स :satara-pcसाताराUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४