शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : ऐकावे ते नवलच : छापा टाकण्यापूर्वीच मुद्देमाल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 14:24 IST

वाठार स्टेशन परिसरात जोमात चाललेल्या अवैध दारू, मटका व्यवसामुळे लागलेला बदनामीचा डाग पुसण्यासाठी वाठार स्टेशन पोलिसांनी कंबर कसली. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी छापे टाकण्याचा निर्णय घेतला; पण छापे पडण्यापूर्वीच तेथील मुद्देमाल गायब झाला.

ठळक मुद्देऐकावे ते नवलच : छापा टाकण्यापूर्वीच मुद्देमाल गायबवाठार स्टेशन पोलीसही गोंधळात

वाठार स्टेशन (सातारा) : वाठार स्टेशन परिसरात जोमात चाललेल्या अवैध दारू, मटका व्यवसायामुळे लागलेला बदनामीचा डाग पुसण्यासाठी वाठार स्टेशन पोलिसांनी कंबर कसली. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी छापे टाकण्याचा निर्णय घेतला; पण छापे पडण्यापूर्वीच तेथील मुद्देमाल गायब झाला.याबाबत माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी छापा टाकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नियोजन केले. दिवस ठरला, पथक तयार केले. पोलीस ठाण्यातून गाडी नियोजित जागेकडे धावू लागली; परंतु ही माहिती नेहमीप्रमाणे अवैध व्यावसायिकांना मिळाली. छापा टाकण्यापूर्वीच सर्व ऐवज गायब झाला. छाप्याची माहिती संबंधितांना समजलीच कशी, याचं कोडं अधिकाऱ्यानाही पडलं असावं.कोरेगाव तालुक्यातील ४७ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या वाठार पोलीस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी नवे अधिकारी दाखल झाले. दरम्यानच्या काळात अवैध व्यवसायाने जोर धरला. भुरट्या चोऱ्याही वाढल्या. पंधरा दिवसांत तीन मोटारसायकल चोरीला गेल्या. बाजारपेठेतून मोबाईल, पाकीटमारीचे सत्र सुरूच आहे.वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नवीन अधिकाऱ्यांनी छापा टाकण्याचे नियोजन केले. मात्र, तत्पूर्वीच सर्व ऐवज गायब झाल्याने तो फोल ठरला. वाठार स्टेशन, अंबवडे आणि पिंपोडे बुद्रुक ही मोठ्या बाजारपेठेची ठिकाणे आहेत. या ठिकाणी जुगार, मटका, दारू व्यवसाय, भुरट्या चोऱ्या रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याची गरज आहे.

काही दिवसांपूर्वी देऊर येथील अवैध दारू व्यावसायिकावर आम्ही छापा टाकला होता. मात्र, यावेळी त्याच्याकडं मुद्देमाल आढळून आला नाही. मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.- मारुती खेडकरसहायक पोलीस निरीक्षक,वाठार स्टेशन

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर