शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : मागासवर्गीयांच्या पुनर्वसनाची जमीन रेल्वेने बळकावली : पार्थ पोळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 16:32 IST

कोरेगाव तालुक्यातील भीमनगर येथे कोयना धरणातून विस्थापित झालेल्या मागासवर्गीय लोकांची तब्बल १२ एकर जमीन कोणताही मोबदला न देता रेल्वे खात्याने बळकावली आहे. या प्रकारामुळे बाधित लोक भूमिहीन झाले असून, त्याविरोधात ३१ मे रोजी सकाळी दहा वाजता जरंडेश्वरच्या हद्दीत रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याची माहिती मागासवर्गीय शेतकरी, धरणग्रस्त पंचायतचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमागासवर्गीयांच्या पुनर्वसनाची जमीन रेल्वेने बळकावली : पार्थ पोळके३१ मे रोजी जरंडेश्वर हद्दीत रेल रोको आंदोलन करणार

सातारा : कोरेगाव तालुक्यातील भीमनगर येथे कोयना धरणातून विस्थापित झालेल्या मागासवर्गीय लोकांची तब्बल १२ एकर जमीन कोणताही मोबदला न देता रेल्वे खात्याने बळकावली आहे. या प्रकारामुळे बाधित लोक भूमिहीन झाले असून, त्याविरोधात ३१ मे रोजी सकाळी दहा वाजता जरंडेश्वरच्या हद्दीत रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याची माहिती मागासवर्गीय शेतकरी, धरणग्रस्त पंचायतचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.पार्थ पोळके म्हणाले, कोयना धरणातून सुमारे ६२ वर्षांपूर्वी विस्थापित झालेल्या मागासवर्गीय कुटुंबांचे पुनर्वसन भीमनगर (ता. कोरेगाव) येथे झाले होते. वास्तविक पुनर्वसन खात्याने पुनर्वसनासाठी जी जमीन संपादित केली होती, त्या ठिकाणी मागासवर्गीयांची ४५० लोकसंख्येचे गाव आहे. असे असताना रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना न देता या विस्थापित मागासवर्गीयांची जवळजवळ १२ एकर जमीन अनधिकृतपणे बळकावली आहे.

महाराष्ट्रातील कोणत्याच धरणातील विस्थापित मागासवर्गीय सुखी नाही. कोयना धरण होऊन ६२ वर्षे झाली, या धरणातील मागासवर्गीयांचे हाल अतिशय वाईट आहेत. जावळी तालुक्यातील आंबेडकर नगरातील विस्थापित मागासवर्गीयांनी स्वत: जमिनी खरेदी करून घरेबांधली आहेत. शासनाने या लोकांना कायद्याने असलेली मदत केलेली नाही.या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना संघटनेने निवेदन दिले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, राज्य उपाध्यक्ष भिकू सपकाळ, अनंता कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, नामदेव जगताप, शांताराम कांबळे, गौरव कांबळे आदी उपस्थित होते.मागासवर्गीयांना भूमिहीन करण्याचा डावपुनर्वसन करताना ४५ एकराची जमीन देण्यात आली होती. त्यावर लोक विस्थापित झाले. त्यापैकी १२ एकर जमीन कोणतीही माहिती न देता परस्पर काढून घेऊन मागासवर्गीयांना भूमिहीन करण्यासाठी हा मोठा डाव आखला गेला आहे, याविरोधात जोरदार संघर्ष करणार असल्याचे पार्थ पोळके यांनी सांगितले.या आहेत मागण्या

  1. -रेल्वेने घेतलेल्या जमिनीच्या मोबदल्यात पर्यायी जमीन मिळावी
  2. - रेल्वे लाईन बाधित शेतकऱ्यांच्या मुलांना रेल्वेच्या सेवेत घ्यावे
टॅग्स :Satara areaसातारा परिसरrailwayरेल्वे