शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा, कऱ्हाड , फलटण शहरे केरोसीनमुक्त..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:45 IST

सातारा जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड व फलटण ही शहरे केरोसीनमुक्त करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला यश आले आहे. या शहरांतील महिन्याकाठी जाणारे १५ टँकर आता बंद झाले आहेत.

ठळक मुद्देसातारा, कऱ्हाड , फलटण शहरे केरोसीनमुक्त..पुरवठा विभागाची कार्यवाही : १२ हजार लिटरची झाली बचत

सागर गुजर सातारा : जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड व फलटण ही शहरे केरोसीनमुक्त करण्यात जिल्हा पुरवठा विभागाला यश आले आहे. या शहरांतील महिन्याकाठी जाणारे १५ टँकर आता बंद झाले आहेत.या तिन्ही शहरांमधील रेशनिंग दुकानदार महिनाकाठी १५ टँकर रॉकेलची मागणी करत होते. या शहरांमध्ये प्रत्येक कुटुंबात गॅस कनेक्शन असतानाही रॉकेलची मागणी कशी होते? याबाबत शंका आल्याने पुरवठा विभागाने या शहरांत कार्यवाही सुरू केली.यासाठी शहरांतील गॅस एजन्सीजची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये केरोसीन मागणी करणाऱ्या रेशनिंग ग्राहकांकडे गॅस आहे का? याची तपासणी करण्यात आली. अनेकांनी रेशनिंग कार्डवर गॅसचा उल्लेख टाळला होता. त्यामुळे रेशनिंग व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर केरोसीनची मागणी करत होते.गॅसच्या तपासणीत अनेकांनी कूरकूर केली. काही रेशनिंग व्यावसायिक ही माहिती लपवत होते. मात्र प्रशासनाने दट्ट्या लावला. केरोसीन घेणाऱ्या रेशनिंग ग्राहकांकडून गॅस नससल्याचे हमीपत्र घेण्यात आले. तसेच माहिती दडविणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला होता. सलग तीन महिने चाललेल्या या कार्यवाहीमध्ये केरोसीनची मागणी करणाऱ्या अनेक ग्राहकांकडे गॅस कनेक्शन असल्याचे आढळून आले.दरम्यान, ज्या ग्राहकांकडे गॅस कनेक्शन नाही, अशा ग्राहकांची माहिती मिळाल्याने त्यांना शासनाच्या उज्ज्वला योजनेतून मोफत गॅस देण्यात आला. या मोहिमेमुळे तब्बल ८० किलो लिटर केरोसीन वाचले आहे. महिन्याकाठी १ लाख ८० हजार लिटर केरोसीनची बचत झाली. रेशनिंगला प्रति लिटर ३० रुपयांनी दर पकडला तरी त्याची किंमत तब्बल ५४ लाख रुपये इतकी होते.जिल्हा पुरवठा विभागाने हे पाऊल उचलल्याने काळाबाजारावर आळा बसला आहे. ग्राहकांची मागणी नसताना रॉकेलची मागणी करणाऱ्या रेशनिंग पुरवठादारांना यामुळे चाप बसला. त्यामुळे ग्राहकांचे पितळही उघडे पडले आहे.

जिल्ह्यातील ज्या ग्राहकांना केरोसीनची आवश्यकता आहे, त्यांना ते दिले जाईल. मात्र जास्तीत जास्त ग्राहक हे उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जोडून गरीब जनतेला गॅसचा लाभ दिला जाणार आहे.- स्नेहा किसवे-देवकाते,जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर