शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : महिलेच्या पर्समधून दागिन्याचा डबा चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 13:40 IST

मुंबईहून साताऱ्यात नातेवाइकांच्या वास्तुशांतीसाठी आलेल्या महिलेचे सुमारे ७३ हजार रुपयांचे दागिने हातोहात लांबविल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सातारा बसस्थानकात घडली.

ठळक मुद्देमहिलेच्या पर्समधून दागिन्याचा डबा चोरीससातारा बसस्थानकातील घटना: दोन महिलांचे कृत्य

सातारा : मुंबईहून साताऱ्यात नातेवाइकांच्या वास्तुशांतीसाठी आलेल्या महिलेचे सुमारे ७३ हजार रुपयांचे दागिने हातोहात लांबविल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सातारा बसस्थानकात घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमिता रत्नाकर आटपाडकर (वय ४५, रा. एरोली, नवी मुंबई) या बुधवारी त्यांच्या आईसोबत साताऱ्यांत नातेवाइकांच्या वास्तुशांतीसाठी आल्या होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर त्या मुंबईला जाण्यासाठी आईसोबत बसस्थानकात आल्या. यावेळी त्यांच्या आईजवळ असलेल्या पिशवीतील डब्यात दागिने आणि रोकड ठेवली होती.

दोघीही चालत रिक्षा थांब्याकडे जात असताना तेथे दोन महिला आल्या. त्या महिलांनी बोलण्याचा बहाणा करत पर्समधील दागिन्यांचा डबा हातोहात लांबविला. डब्यामध्ये मंगळसूत्र, टॉप्स, तोडे यासह १७ हजारांची रोकड होती.

दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर आटपाडकर यांनी बसस्थानकातील पोलीस चौकीमध्ये जाऊन याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी बसस्थानकात सगळीकडे संबंधित महिलांचा शोध घेतला. मात्र, त्या महिला सापडल्या नाहीत.सीसीटीव्हीत कैद...चोरी करणाऱ्या दोन महिला सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. मात्र, त्यांनी तोंडाला स्कार्प बांधल्यामुळे त्यांची ओळख कशी पटवायची, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर