शहरं
Join us  
Trending Stories
1
पात्र, अपात्र धारावीकरांना धारावीतच घर; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार: मुख्यमंत्री फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : रविवार ११ जानेवारी २०२६; आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण खुश व्हाल, अचानक नशिबाची साथ मिळेल 
3
"बीस साल बाद एकत्र आलेले विकासात खोडा घालत आहेत"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
4
दाढीवाले जातीय तेढ निर्माण करून मागतात मते; सरकार नसून तमासगीर झालंय: हर्षवर्धन सपकाळ
5
भाजपने विकास केला म्हणून 'ते' वैतागले आहेत; मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले
6
'अहमदाबादचे नामांतर करण्याची हिंमत दाखवा'; अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे आव्हान
7
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
8
महापालिका रणांगणात मनसेची 'नवी फळी'; २६ उमेदवार कोट्यवधी संपत्तीचे मालक
9
पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला कंडक्टरने एसटीतून हायवेवर उतरवले!
10
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
11
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
12
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
13
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
14
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
15
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
16
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
17
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
18
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
19
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
20
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :एटीएमची आदलाबदल करून रोकड लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:25 IST

सातारा : एटीएमची आदलाबदल करून १४ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात युवकावर ...

ठळक मुद्देएटीएमची आदलाबदल करून रोकड लांबविलीलॅब अ‍ॅसिस्टंटची फसवणूक: चोरटा सीसीटीव्हीत कैद

सातारा : एटीएमची आदलाबदल करून १४ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.रवींद्र विनायक पवार (वय ५५,रा. सैदापूर, ता. सातारा) हे एका महाविद्यालयात लॅब अ‍ॅसिस्टंट आहेत. गुरुवारी दुपारी ते पैसे काढण्यासाठी भूविकास चौकातील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एटीएममध्ये गेले होते.

यावेळी त्यांनी एक हजार रुपये काढले; परंतु एटीएममधून पावती बाहेर आली. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या युवकाने मी पावती काढून देतो, असे त्यांना सांगितले. त्यांनी त्या युवकाला एटीएम दिले. मात्र, संबंधित युवकाने हातचलाखी करून एटीएमची अदलाबदल केली.

एटीएममधून पावती काढण्याच्या बहाण्याने त्याने पवार यांच्याकडून एटीएमचा पासवर्डही विचारला होता. त्यामुळे तेथून निघून गेल्यानंतर त्याने एका दुकानातून सोन्याचा कॉईन खरेदी केला. त्यानंतर त्याने त्याच एटीएममधून १४ हजारांची रोकड काढली.रवींद्र पवार यांच्या मोबाईलवर एसएमएस आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याबाबत अधिक तपास हवालदार हिम्मत दबडे-पाटील हे करत आहेत.चोरटा सीसीटीव्हीत कैदज्या एटीएममधून चोरट्याने पैसे काढले. त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीत चोरटा कैद झाला आहे. त्यावरून पोलिसांना त्याचा शोध घेणे सोपे होणार आहे.

टॅग्स :atmएटीएमCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर