शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

Satara news: फळबागा नसताना भरला विमा; भरपाई लाटण्याचा डाव, १४२ बोगस प्रकरणे

By नितीन काळेल | Updated: April 20, 2023 18:10 IST

ज्या शेतकऱ्यांनी बाग नसतानाही विमा भरला, त्यांच्यावर काय कारवाई होणार?

नितीन काळेलसातारा : फळबाग नसतानाही आंबिया बहरात विमा भरून भरपाई लाटण्याचा डाव जिल्ह्यात उघडकीस आला असून, यासंदर्भाने तपासणीही पूर्ण झाली आहे. यामध्ये ५९९ शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यातील १४२ जण बोगस असल्याचे समोर आल्याची माहिती हाती आली आहे.अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीत फळबागांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातही पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. २०२१च्या मृग बहरापासून २०२२-२३ च्या आंबिया बहरापर्यंत ९ हजार ८८३ शेतकऱ्यांनी या विमा योजनेत सहभाग घेतला आहे. तर फळबागा नसतानाही विमा लाभ घेतलेली अनेक प्रकरणे राज्यात उघडकीस आली आहेत. त्यामुळे याची तपासणी करण्यात येत आहे.सातारा जिल्ह्यातही फळबागांचा विमा उतरविलेल्या क्षेत्राची तपासणी प्रक्रिया झाली. आंबिया बहरातील ही तपासणी होती. यातून कितीजणांनी कागदावरच फळबागांचा विमा भरला ते समोर आलेले आहे. अशांची संख्या १४२ इतकी आहे, तर यासाठी ५९९ जणांनी विमा भरला होता, असे कृषी विभागातील सुत्रांनी सांगितले.

कारवाई होणार का ?फळबाग विमा ज्या शेतकऱ्यांनी भरला आहे, त्या शेतकऱ्यांची तपासणी झाली आहे. शेतकऱ्याकडे खरंच फळबाग आहे का ? किती क्षेत्र आहे, किती विमा भरला, याची माहिती घेण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी बाग नसतानाही विमा भरला, त्यांच्यावर काय कारवाई होणार, हे स्पष्ट नाही.

मृग बहरासाठी पाच हजार शेतकरी सहभागी...

गेल्या वर्षी मृग बहरात फळपीक विमा रक्कम भरणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ४ हजार ७८४ इतकी आहे. त्यांनी २ हजार ३७२ हेक्टरसाठी विमा काढला होता. त्यासाठी ३० कोटी ८४ लाख इतकी विमा संरक्षित रक्कम होती, तर १ कोटी ५४ लाख २० हजार रुपये हप्त्यापोटी भरले होते. आंबियानंतर मृग बहरातील तपासणी होणार आहे का ? याबाबत अद्याप निश्चित काही झालेले नाही.

आंबिया बहरात २५१ हेक्टर क्षेत्र...रब्बीमधील २०२२-२३ वर्षात आंबिया बहरात विम्यात ५९९ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. तर २५१ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित होते. त्यासाठी ३३ लाख ८७ हजार ६४४ रुपये विमा हप्ता रक्कम शेतकऱ्यांनी भरली आहे.

पाच फळबागांसाठी योजना...

सातारा जिल्ह्यात फळपीक विमा योजना पाच फळांसाठी आहे. यामध्ये द्राक्ष, आंबा, केळी, स्ट्राॅबेरी आणि डाळिंब यांचा समावेश आहे.

तपासणीत तिघांचा समावेश...आंबिया बहरातील बोगस फळपीक विमा शोधण्याचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी संबंधित विमा कंपनी प्रतिनिधी, तलाठी आणि कृषी सहायकांचा समावेश करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ही तपासणी करण्यात आली.

१४२ बोगस; शासनाकडे प्रस्ताव...

जिल्ह्यातील आंबिया बहरातील फळबागांचा विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांच्या क्षेत्राची तपासणी झाली आहे. त्यातून १४२ बोगस प्रकरणे आढळली. याचा प्रस्ताव आता शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी