शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : अपघातग्रस्त एसटीची परिवहन विभागाकडून होणार तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 15:43 IST

सातारा-सज्जनगड मार्गावरील बोरणे घाटानजीक राजापुरी फाटा येथे रविवारी दुपारी जांभे-सातारा या एसटीचा ब्रेक निकामी होऊन अपघात झाला. या एसटीची परिवहन विभागाचे अधिकारी तपासणी करणार आहेत. त्यानंतरच अपघाताचे खरे कारण समोर येणार आहे.

ठळक मुद्देअपघातग्रस्त एसटीची परिवहन विभागाकडून होणार तपासणी!ब्रेक निकामी झाल्याने झाला होता अपघात

गोडोली : सातारा-सज्जनगड मार्गावरील बोरणे घाटानजीक राजापुरी फाटा येथे रविवारी दुपारी जांभे-सातारा या एसटीचा ब्रेक निकामी होऊन अपघात झाला. या एसटीची परिवहन विभागाचे अधिकारी तपासणी करणार आहेत. त्यानंतरच अपघाताचे खरे कारण समोर येणार आहे.सातारा आगाराची जांभे ते सातारा जाणाऱ्या बसचा (एमएच ०७ सी ९०३६) ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला होता. त्यामध्ये सव्वीस प्रवासी जखमी झाले होते. या गाडीचा ब्रेक निकामी झाल्याने वाढलेल्या वेगावर नियंत्रण मिळविण्यासाठी गाडी रस्त्याकडेला असलेल्या कठड्यावर धडकवल्याचे चालक सांगत आहे.

असे असलेतरी गाडी चालवताना चालकाने दारू पिल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला होता. त्यानुसार खरेच त्या गाडीचा ब्रेक निकामी झाला होता का? दुसरे काय झाले होते, याची खात्री करण्यासाठी रविवारीच वैद्यकीय तपासणी करण्यासाठी चालकाला रुग्णालयात घेऊन एसटीचे अधिकारी गेले होते.

एसटीच्या ब्रेकची चाचणी घेऊन तो निकामी झाला आहे का ते पाहिले जाणार आहे. प्रथम हे काम एसटी विभागाकडून केले जाणार असून, त्यानंतर परिवहन विभागाकडूनसुद्धा ब्रेकची चाचणी केली जाणार आहे. या सगळ्या चाचण्या अन् चालकाचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात