शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : स्वच्छतेसाठी मी तयार आहेची दारोदारी रांगोळी, मलकापुरात संदेश उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 17:16 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी मलकापूर शहराने कंबर कसली आहे. विविध उपक्रम राबवत प्रत्येक घरातील महिलांकडून स्वच्छतेसाठी पुढाकार घेत मी तयार आहे या ब्रँडची दररोज दारादारात रांगोळी उमटत आहे. हा ब्रँड तळागाळात पोहोचवून मलकापूरला देशातील पहिल्या पंचवीस शहरात आणण्यासाठी घरोघरी स्वच्छतेचाच पाठ वाचला जात आहे.

ठळक मुद्देस्वच्छतेसाठी मी तयार आहेची दारोदारी रांगोळीमलकापुरात संदेश उपक्रम

मलकापूर : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी मलकापूर शहराने कंबर कसली आहे. विविध उपक्रम राबवत प्रत्येक घरातील महिलांकडून स्वच्छतेसाठी पुढाकार घेत  मी तयार आहे या ब्रँडची दररोज दारादारात रांगोळी उमटत आहे. हा ब्रँड तळागाळात पोहोचवून मलकापूरला देशातील पहिल्या पंचवीस शहरात आणण्यासाठी घरोघरी स्वच्छतेचाच पाठ वाचला जात आहे.मलकापूर शहराने स्वच्छतेबाबत सातत्याने विविध पर्याय करत सध्या देशातील मोजक्याच शहरात आपले स्थान प्राप्त केले आहे. नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने विशेष नियोजन केले असून, शहरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्यासाठी ९ घंटागाड्या सुरू ठेवल्या आहेत. यामध्ये ५ नवीन घंटागाड्यांचा समावेश आहे.

घराघरातील महिलाही ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे घंटागाडीतच देत आहेत. त्यासाठी शहरातील १० हजार घरांत प्रत्येकी दोन बकेटप्रमाणे २० हजार बकेटचे वाटप केले आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प ८ जुलै २०१७ पासून कार्यान्वित केला आहे.स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी शहरातील १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, १४ खासगी विद्यालये, महाविद्यालये, २२ अंगणवाड्या यांचा सामावेश केला आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालकांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवले आहे. या अभियानात शहरातील सर्व नागरिकांनी स्वत:साठीच स्वच्छता करायची आहे.

हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. नगरपंचायत स्तरावरील राज्यातील पहिलीच भुयारी सांडपाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्वच्छता अभियान ही स्पर्धा नव्हे तर एक चळवळ म्हणून त्याकडे मलकापूरवासीयांनी लक्ष केंद्रित केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान