शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : बिर्याणीचे पैसे मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 13:13 IST

गोडोली येथील बिर्याणी हाऊसमध्ये जेवण केल्याचे पैसे मागितले असता तरुणांच्या टोळक्याने दगड व लोखंडी गजाने हॉटेलची तोडफोड केल्याची घटना घडली. तसेच हॉटेल चालकाला मारहाण केल्याने सोमवारी रात्री उशिरा साईबाबा मंदिर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.

ठळक मुद्देबिर्याणीचे पैसे मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाणतरुणांच्या टोळक्याचा धिंगाणा, साहित्याची केली तोडफोड

सातारा : गोडोली येथील बिर्याणी हाऊसमध्ये जेवण केल्याचे पैसे मागितले असता तरुणांच्या टोळक्याने दगड व लोखंडी गजाने हॉटेलची तोडफोड केल्याची घटना घडली. तसेच हॉटेल चालकाला मारहाण केल्याने सोमवारी रात्री उशिरा साईबाबा मंदिर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.याबाबत माहिती अशी की, गोडोली येथील शगून बेकरी अँड फर्माश बिर्याणी हाऊस आहे. याठिकाणी सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ऋतिक शिंदे (रा. जोशीवाडा, गोडोली) हा बिर्याणी खाण्यासाठी आला.

बिर्याणी खाऊन झाल्यानंतर तो बाहेर जात असताना हॉटेल चालक अब्दुल अजीज छोटूभाई शेख (वय ६८, रा. गोडोली) यांनी बिर्याणीचे पैसे मागितले. याचा राग मनात धरून अकरा वाजण्याच्या सुमारास ऋतिक व त्याचे चार ते पाच मित्र हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी दगडफेक करून बेकरीचा बोर्ड व सीसीटीव्ही कॅमेरा फोडला.

तसेच लोखंडी गजाने डीप फ्रिजर व लाईट तोडून हॉटेलचे नुकसान केले. त्यामुळे साईबाबा मंदिर परिसरात परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर अब्दुल शेख यांनी फिर्याद दिली. अधिक तपास हवालदार हिंडे करीत आहेत.

 

टॅग्स :Crimeगुन्हाSatara areaसातारा परिसर