शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : हायवे क्लोज.. बोगदा ओपन, पुणे-बेंगलोर महामार्गावर सहा मालवाहू ट्रक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 15:22 IST

पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटात सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यातच शनिवारी दुपारी सहा मालट्रक अचानक बंद पडल्याने महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली.

ठळक मुद्देहायवे क्लोज.. बोगदा ओपन, पुणे-बेंगलोर महामार्गावर सहा मालवाहू ट्रक बंदकोंडी टाळण्यासाठी पुणे बाजूकडील वाहतूक वळविली

शिरवळ : पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटात सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यातच शनिवारी दुपारी सहा मालट्रक अचानक बंद पडल्याने महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली.दरम्यान, कोंडी टाळण्यासाठी पुण्याहून साताऱ्याकडे येणारी वाहतूक खंबाटकी बोगद्यातून वळविण्यात आली आहे. शनिवार, रविवार सलग सुट्यांमुळे नागरिक फिरण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहे.

प्रामुुख्याने थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. शनिवारी सकाळपासून पुणे-बेंगलोर महामार्गावर वाहनांची संख्या हळूहळू वाढू लागली. दुपारनंतर वाहतूक संथ गतीने सुरू होती.दरम्यान, शनिवारी दुपारी खंबाटकी घाटातील वळणावर विविध ठिकाणी सहा मालट्रक इंजिन गरम झाल्याने बंद पडले. परिणामीे महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या कोंडीतून मार्ग काढताना पर्यटकांसह वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली.

सुटीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचा वाहतूक कोंडीने हिरमोड झाला. वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

यावर तोडगा काढण्यासाठी पुण्याहून सातारा बाजूकडे येणारी वाहतूक खंबाटकी बोगद्यातून वळविण्यात आली आहे. खंडाळा व भुर्इंज महामार्ग पोलिसांकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad transportरस्ते वाहतूक