शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा, जावळीत जुगार, दारू अड्ड्यांवर छापे, सातजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 15:52 IST

सातारा शहरात आणि जावळी तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार आणि दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे १५ हजारांचा ऐवज जप्त केला.

ठळक मुद्देसातारा, जावळीत जुगार, दारू अड्ड्यांवर छापेसातजणांना अटक : १५ हजारांचा ऐवज जप्त

सातारा : शहरात आणि जावळी तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार आणि दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे १५ हजारांचा ऐवज जप्त केला.सातारा बसस्थानकासमोर असणाऱ्या शौचालयाच्या आडोशाला मटका घेताना शाहूपुरी पोलिसांनी रवींद्र रामचंद्र दीक्षित (वय ४१, रा. कोटेश्वर मंदिराच्या पाठीमागे, गडकरआळी सातारा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६७५ रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.

हा मटका तो मालक जब्बार जमाल पठाण (रा. मेढा, ता. जावळी) याच्यासाठी घेत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी पठाणच्या विरोधातही गुन्हा दाखल केला.जावळी तालुक्यातील सोमर्डी गावच्या हद्दीतील एका वीटभट्टीच्या पाठीमागे सुरू असणाऱ्या दारूच्या अड्ड्यावर मेढा पोलिसांनी छापा टाकला. यावेळी अभिजित निरंजन परामणे (वय ३०, रा. सोमर्डी, ता. जावळी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी-विदेशी दारूच्या ६५ बाटल्या आणि रोख रक्कम असा सुमारे ६ हजार ९६३ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.तिसरी कारवाईसुद्धा जावळी तालुक्यातीलच खर्शीबारामुरे गावच्या हद्दीत करण्यात आली. यावेळी पोलिसांनी रमेश प्रकाश गोळे, दत्तात्रय ढमाळ, दिगंबर रघुनाथ कांबळे, निखिल नंदकुमार झणझणे (रा. सर्व रा. खर्शीबारामुरे, ता. जावळी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी-विदेशी दारूच्या २७ बाटल्या आणि रोख रक्कम असा सुमारे २ हजार ७६२ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.तिसरी कारवाई करहर, ता. जावळी येथील गावच्या हद्दीत प्रकाश धोंडिबा गोळे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. या ठिकाणी राहुल सदाशिव गावडे (वय ३६), संदीप आनंदा तुपे (वय ३०, दोघेही रा. खर्शीबारामुरे, ता. जावळी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांकडून १० हजार ८०० रुपयांचे जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर