शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : मुलांच्या दोन गटांतील भांडणे आजोबांनी सोडवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 13:10 IST

रस्त्यावर अपघात किंवा भांडणे सुरू असल्यास अनेकजण कानाडोळा करून पुढे जातात. आपले काहीच देणे-घेणे नाही, असे समजून अनेकजण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचे आजूबाजूला आपल्याला पाहिला मिळते. परंतु साताऱ्यातील एक आजोबा याला अपवाद ठरले आहेत.

ठळक मुद्देराजवाड्यावरील सकाळच्या सुमारास प्रकार नागरिकांकडून आजोबांचे कौतुक

सातारा : रस्त्यावर अपघात किंवा भांडणे सुरू असल्यास अनेकजण कानाडोळा करून पुढे जातात. आपले काहीच देणे-घेणे नाही, असे समजून अनेकजण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचे आजूबाजूला आपल्याला पाहिला मिळते. परंतु साताऱ्यातील एक आजोबा याला अपवाद ठरले आहेत.असाच एक किस्सा बुधवारी सकाळी सातच्या सुमारास राजवाडा परिसरात घडला. महाविद्यालयात जाणारे दोन युवक चालत राजवाडा बसस्थानकाकडे निघाले होते. यावेळी अचानक तीन ते चार युवकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारहाण करण्यास सुरूवात झाल्यानंतर रस्त्यावर धावाधाव सुरू झाली. त्या दोन्ही युवकांना पाठलाग करून चौघा युवकांनी पकडले. भर रस्त्यातच त्यांना मारहाण करण्यात येत होती.

यावेळी सकाळच्या सुमारास रस्त्यावर तुरळक गर्दी असली तरी काहीजण तेथून ये-जा करत होते. उघड्या डोळ्यांनी हा सारा प्रकार ते पाहात होते. मात्र, कोणीच पुढे होऊन त्या मुलांचा वाद सोडवत नव्हते. अखेर पुढे होऊन एक आजोबा त्या मुलांच्या दिशेने धावले. सत्तरी पार केलेल्या आजोबांनी त्या मुलांच्या अक्षरश: घोळक्यात घुसून मारहाण करणाऱ्या युवकांना बाजूला ढकलले.

थोडीफार त्यांनी आपल्या भाषेत मुलांना तंबीही दिली. आजोबांनी मस्थती केल्यामुळे वाद तर मिटलाच ; शिवाय त्या मुलांना होणारी गंभीर दुखापत टळली. वादावादी करणारी मुले आपापल्या वाटेने निघून गेली. त्यानंतर ज्यांनी हा प्रकार पाहिला त्या लोकांनी आजोबांकडे जाऊन त्यांचे कौतुक केले.

तुम्ही नसता तर त्या बिचाऱ्या दोन मुलांचे काही खरे नव्हते. अशी चिंता व्यक्त करून कोणी तरी अशा प्रकरणामध्ये पुढे आलेच पाहिजे, असं त्या लोकांनी मत व्यक्त केलं. त्यातील काही लोकांनी आजोबांना त्यांच नाव विचारलं तर अरे नावात काय असतं, असा उलट प्रश्न करून आजोबांनी छानसं स्मितहास्य केलं आणि तेथून ते निघून गेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर