शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :पाच वाहनांतून पन्नास गायी, बैलांची वाहतूक जनावरांची सुटका : वासरासह बैलाचा कोंडमाºयाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 13:08 IST

गायी आणि बैलांची बेकायदा वाहतूक करणारी पाच वाहने पोलिसांसह युवकांनी पकडली. कत्तलीसाठी नेल्या जाणाºया सुमारे ४७ जनावरांची यावेळी सुटका करण्यात आली. मात्र, कोंडमारा झाल्यामुळे वाहनातच एका वासरासह बैलाचा मृत्यू झाल्याचे युवकांना दिसून आले.

ठळक मुद्देपाच वाहनांतून पन्नास गायी, बैलांची वाहतूकजनावरांची सुटका : वासरासह बैलाचा कोंडमाºयाने मृत्यू; चालकांना चोप

आॅनलाईन लोकमत ढेबेवाडी/मल्हारपेठ : गायी आणि बैलांची बेकायदा वाहतूक करणारी पाच वाहने पोलिसांसह युवकांनी पकडली. कत्तलीसाठी नेल्या जाणाºया सुमारे ४७ जनावरांची यावेळी सुटका करण्यात आली. मात्र, कोंडमारा झाल्यामुळे वाहनातच एका वासरासह बैलाचा मृत्यू झाल्याचे युवकांना दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकांनी संबंधित वाहनाच्या चालकांना चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कºहाड-ढेबेवाडी मार्गावरून सोमवारी सकाळी जनावरांची बेकायदा वाहतूक केली जाणार असल्याची माहिती ढेबेवाडी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मालदन घाटात नाकाबंदी करून तीन टेम्पो अडविले. त्यामध्ये सुमारे तीस बैल आढळून आले. संबंधित वाहने पोलीस ठाण्यात नेण्यात आली. जनावरे टेम्पोतून खाली उतरविण्यात आली. त्यावेळी एका टेम्पोत गुदमरून बैलाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. 

दरम्यान, रविवारी रात्री उशिरा कºहाड-पाटण मार्गावरून गायींची वाहतूक केली जाणार असल्याचे समजल्यानंतर नवारस्ता येथे युवकांनी दोन जीप अडविल्या. त्यामध्ये पंधरा देशी गायी आढळून आल्या. सर्व गायी युवकांनी जीपमधून खाली उतरविल्या. त्यावेळी एका वासराचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकांनी संबंधित जीपच्या चालकांना बेदम चोप दिला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाटण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी चालकांना ताब्यात घेतले. तसेच जनावरेही पोलीस ठाण्यात आणण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस