शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : ऐतिहासिक तळ्यातून काढला पंधरा ट्रॉली गाळ, औंधमध्ये महाश्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 13:38 IST

औंध येथील मूळपीठ डोंगराच्या पश्चिमेकडील बाजूस असणाऱ्या ऐतिहासिक तळ्याच्या स्वच्छतेसाठी गेल्या आठ दिवसांपासून हजारो हात झटत असून, महाश्रमदानाद्वारे तळ्यातील गाळ, दगडे, झुडपे काढण्यात आली.

ठळक मुद्देऐतिहासिक तळ्यातून काढला पंधरा ट्रॉली गाळऔंधमध्ये महाश्रमदान, स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात

औंध (सातारा) : औंध येथील मूळपीठ डोंगराच्या पश्चिमेकडील बाजूस असणाऱ्या ऐतिहासिक तळ्याच्या स्वच्छतेसाठी गेल्या आठ दिवसांपासून हजारो हात झटत असून, महाश्रमदानाद्वारे तळ्यातील गाळ, दगडे, झुडपे काढण्यात आली.दरम्यान, या श्रमदानासाठी औंध येथील विविध युवा मंडळांचे सदस्य, युवक,ग्रामस्थ तसेच सातारा फेसबुकचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. महाश्रमदानातून तळ्यातील १५ ट्रॉली गाळ बाहेर काढण्यात आला.मूळपीठ डोंगरावरील ऐतिहासिक तीन मजली तळे हे काळ्या पाषाणातील दगडी कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. संस्थान काळात या तळ्यची उभारणी करण्यात आली असून, आजही हे तळे सुस्थितीत आहे.

औंध येथील सामाजिक काम करणाऱ्या ग्रामस्थ व युवकांनी पंधरा दिवसांपूर्वी तळे स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. सकाळी सहा ते नऊ यावेळेत युवकांकडून, ग्रामस्थांकडून नियमित श्रमदान केले जात आहे.यामध्ये तळयातील छोटी झुडपे, गवत, दगड तसेच मातीगाळ काढण्यावर भर दिला जात आहे. तळ्याची स्वच्छता केल्यानंतर तळे परिसरातील गवत, झुडपे काढून त्याठिकाणी डोंगरावरील मोकळ्या जागेत डीपसीसीटी, चरी काढून त्याठिकाणी पाणी अडवून विविध प्रकारची झाडे लावली जाणार आहेत. तसेच तळ्याच्या वरील बाजूस मोठी चर काढून ते पाणी तळ्यात आणून सोडले जाणार आहे. त्यामुळे तळयातील जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.रविवारी दिवसभर महाश्रमदानाद्वारे तळ्याच्या स्वच्छतेचे काम सुरू होते. यावेळी सभापती संदीप मांडवे, समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड यांनी श्रमदान ठिकाणी भेट देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आलेल्या सर्व श्रमदात्यांना माजी उपसरपंच राजेंद्र्र माने यांच्यातर्फे चहा, नाष्टा व जेवणाची सोय केली होती. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी