शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : इन्शुरन्स मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी, चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 14:03 IST

इन्शुरन्सची रक्कम मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी देऊन रक्कम लाटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, पोलिसांनी त्यांच्याकडून एक ट्रक आणि कार असा सुमारे २३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेकडून टोळीचा पर्दाफाशतब्बल आठ गुन्हे उघडकीस

सातारा : इन्शुरन्सची रक्कम मिळविण्यासाठी ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी देऊन रक्कम लाटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, पोलिसांनी त्यांच्याकडून एक ट्रक आणि कार असा सुमारे २३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.आसिफ रफिक पठाण (वय २९, रा. राजोपाध्येनगर, ता. करवीर जि. कोल्हापूर), जमीर इब्राहिम हारचीकर (४०, रा. जवाहरनगर, सिरत मौहल्ला, कोल्हापूर), अन्वर दाऊद कच्छी (५६, रा. विश्वकर्मा कॉम्प्लेक्स, संभाजीगनर, कोल्हापूर), अतुल सुभाषचंद्र साळुंखे (३३, रा. त्रिमूर्ती कॉलनी, गोडोली, सातारा) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.येथील शिवराज तिकाटणेजवळ रस्त्याकडे ट्रक उभा करून दोघेजण संशयितरीत्या उभे राहिले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी त्यांच्याजवळील ट्रक भंगारात विकण्यासाठी आणला असल्याची माहिती पोलिसांना दिली.

हा ट्रक त्यांनी कोल्हापूर येथील भंगार व्यावसायिकाकडून खरेदी केला असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी कोल्हापुरातील भंगार व्यावसायिकाला अटक केली. त्यालाही पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सारा प्रकार उघड केला.

आसिफ पठाण याने स्वत: ट्रक भंगार व्यावसायिकाला विकून तो ट्रक चोरीस गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर त्यांनी इन्शरन्सची रक्कमही कंपनीकडून वसूल केली होती. एक गुन्हा पचल्यानंतर या टोळीने इस्लामपूर, सांगली, म्हापसा (गोवा) तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्यामध्ये ट्रक चोरीच्या खोट्या तक्रारी त्यांनी दाखल केल्या असल्याचे तपासात समोर आले.त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने करून या टोळीतील चौघांनाही अटक केली. केवळ इन्शुरन्सची रक्कम मिळण्यासाठीच हा सारा त्यांच्या खटाटोप सुरू असल्याचे त्यांनी पोलिसांपुढे कबूल केले.

तब्बल आठ गुन्हे उघडकीससातारा जिल्ह्यात ट्रक चोरीचे ६ गुन्हे, सांगली जिल्ह्यात १, गोवा राज्यात कार चोरीचा एक असे एकूण ८ गुन्हे या टोळीने केल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीकडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा