शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : खड्डे भरण्याची डेडलाईन संपली तरी रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका, कंबरडे मोकळे करण्यासाठी रस्त्यांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 14:52 IST

ज्याचे कंबरडे अवघडले आहे, मान दुखत आहे, अशा व्याधीग्रस्तांनी सातारा शहरातील रस्त्यांवर वेगाने वाहन चालवायला हरकत नाही. हो मात्र ज्यांना उपचाराची गरज आहे, त्यांनी मात्र डॉक्टरांना दाखवावे, असा फलक खड्डेयुक्त रस्त्यांवर लावायला हरकत नाही.

ठळक मुद्देकंबरडे मोकळे करण्यासाठी रस्त्यांवर उपचारजखम रेड्याला आणि मलम पखालिला, सातारा पालिकेचा कारभारपर्यटकांमध्ये सेलिब्रिटी करतात साताऱ्याच्या अवस्थेचा जगभर प्रचार

सातारा : ज्याचे कंबरडे अवघडले आहे, मान दुखत आहे, अशा व्याधीग्रस्तांनी सातारा शहरातील रस्त्यांवर वेगाने वाहन चालवायला हरकत नाही. हो मात्र ज्यांना उपचाराची गरज आहे, त्यांनी मात्र डॉक्टरांना दाखवावे, असा फलक खड्डेयुक्त रस्त्यांवर लावायला हरकत नाही. कंबरडे मोकळे करण्याचा उपचारच जणू या रस्त्यांवर वाहन चालवताना अनुभवायला मिळतो आहे.तातडीची नड लक्षात घेऊन कुठलेही काम हाती घ्यायचे असते; परंतु सातारा पालिकेचा सध्या  जखम रेड्याला आणि मलम पखालिला, या म्हणीनुसार कारभार सुरू आहे. शहरातील राधिका रस्ता तसा प्रचंड वाहतुकीचा आणि प्रशस्तही आहे. याच रस्त्यावर मोठी हॉटेल्स असल्याने साताऱ्यात येणारे पर्यटक याच रस्त्याने येतात.

रस्त्यावरील खड्डे साताऱ्याचे दारिद्र्य उघड करतात. इतर रस्ते तुलनेने चांगले असले तरी या रस्त्याची दुर्दशा पाहून जसे अंगण घराची अवकळा सांगते, त्याच पद्धतीने कामकाज सुरू आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना पुन्हा साताऱ्यात यायलाच नको, असा ठाम निश्चय करूनच काहीजण निघून जातात.

पर्यटकांमध्ये मोठे सेलिब्रिटीही आहेत की जे साताऱ्याच्या अवस्थेचा प्रचार जगभर करत फिरतात. त्यामुळे अशा रस्त्यांवर पडलेले खड्डे पालिकेच्या कारभाराची लख्तरे वेशीला टांगत आहेत, याकडे पालिका केव्हा लक्ष देणार आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.रस्त्यांवर पॅचवर्क होत नसल्याने खड्ड्यांचे आकार वाढत चालले आहेत, याच रस्त्यावर पालिकेचे उपनगराध्यक्ष राजू भोसले यांचेही हॉटेल आहे. ते तरी अजून शांत का आहेत? तातडीची नड म्हणून या रस्त्यावर केव्हाच डांबर पडायला हवे होते. तसे झाले नसल्याने उपनगराध्यक्षांचेही सत्तेत असून वजन राहिले नाही, असा अर्थ सातारकर काढत आहेत.

शहरातील रस्त्यांचे खड्डे मुजविण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. आगामी काही दिवसांत हे रस्ते खड्डेमुक्त होतील. पॅचवर्क करण्याचे काम शहरातील काही रस्त्यांवर सुरू आहे.- माधवी कदम,नगराध्यक्षा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा