शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : अकरा वर्षीय शंकरने वाचविले विहिरीत बुडणाऱ्या महिलेचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 14:33 IST

सातारा तालुक्यातील निगडी-धनगरवाडी येथे राहणाऱ्या एका अकरा वर्षीय मुलाने विहिरीत बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले. शंकर संतोष वाघमोडे असे त्या मुलाचे नाव असून, त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठळक मुद्देअकरा वर्षीय शंकरने वाचविले विहिरीत बुडणाऱ्या महिलेचे प्राणधाडसाचे नागरिकांकडून कौतुकयुथ फाउंडेशनने उचलली शिक्षणाची जबाबदारी

सातारा : सातारा तालुक्यातील निगडी-धनगरवाडी येथे राहणाऱ्या एका अकरा वर्षीय मुलाने विहिरीत बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले. शंकर संतोष वाघमोडे असे त्या मुलाचे नाव असून, त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, निगडी-धनगरवाडी येथे राहणाऱ्या गंगुबाई हणमंत कोरे (वय ४०) या गावातील एका विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या.

विहिरीतून पाणी काढत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या विहिरीत कोसळल्या. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या गावातीलच शंकर वाघमोडे या मुलाने कोणताही विचार न करता थेट विहिरीत उडी घेतली आणि बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले.शंकर हा वयाने लहान असला तरी तो पोहण्यात निपूण आहे. त्याची घरची परिस्थिती जेमतेम असून, वडील शेती करतात. त्याने दाखविलेल्या या धाडसाचे गावकऱ्यांमधून कौतुक होत आहे.

भाजपचे महेश शिंदे यांनी शंकरच्या धाडसाचे कौतुक करण्याबरोबरच महेशदादा शिंदे युथ फाउंडेशनच्या वतीने त्याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. तसेच शौर्य पदकासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कुमार भोईटे, गोजेगावचे उपसरपंच कृष्णात घोरपडे, राजू रणखांबे, बळी वाघमोडे, संतोष वाघमोडेयांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात