शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात मधधुंद चालकाने पाच वाहने उडविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 13:37 IST

सातारा येथील गोडोलीमध्ये मधधुंद पिकअप टेम्पो चालकाने सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पाच वाहने उडविल्याने मोठी खळबळ उडाली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असून,त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देसाताऱ्यात मधधुंद चालकाने पाच वाहने उडविलीदोघे गंभीर जखमी ; गोडोलीत भरदिवसा खळबळ

सातारा : येथील गोडोलीमध्ये मधधुंद पिकअप टेम्पो चालकाने सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पाच वाहने उडविल्याने मोठी खळबळ उडाली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असून,त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दत्तात्रय पांडुरंग नाचण (वय ५०, रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव), नीलेश रामचंद्र आवळे वैद्य (वय ३०, रा. गोडोली, सातारा) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, टेम्पो पिकअप चालक दिनेश लक्ष्मण केरेकर (वय २२, रा. केळवली, ता. सातारा) हा दारूच्या नशेत टेम्पो घेऊन गोडोलीतून अंजठा चौकाकडे निघाला होता.

गोडोली चौकात आल्यानंतर त्याने टेम्पोची अचानक रेस वाढविली. समोर दिसेल त्या वाहनाला धडक देत टेम्पो सुसाट निघाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गोडोलीत प्रचंड खळबळ उडाली. भीतीने लोक गाडी रस्त्यात सोडून सैरावैरा धावू लागले. काहींनी टेम्पोचा पाठलाग करून टेम्पो अजंठा चौकातील उड्डाणपुलाखाली अडवला. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाला जमावाने चांगलाच चोप दिला. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दत्तात्रय नाचण आणि नीलेश वैद्य हे दोघे स्वतंत्र दुचाकीवर होते. या दोघांना या मद्यधुंद टेम्पो चालकाने उडवल्याने यात दोघेही जखमी झाले. काही नागरिकांनी या दोघांना रिक्षाने तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना साताऱ्यातील खासगी दवाखान्यात नेण्यात आले.दरम्यान, टेम्पोच्या धडकेत चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले असून, संबंधित चालकाने भरपाई द्यावी, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात सुरू होती.पुण्यातील घटनेची आठवण..मद्यधूंद टेम्पो चालकाने गोडोलीमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर अनेकांना पुण्यातील घटनेची आठवण झाली. पुणे स्वारगेट येथे काही वर्षांपूर्वी एका बस चालकाने अशाच प्रकारे भरस्त्यातील वाहने उडवत नागरिकांचा बळी घेतला होता. असाच काहीसा प्रसंग सोमवारी साताऱ्यात घडल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर