शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सातारा : कोयनेचे दरवाजे आता सात फुटांवर, नदीच्या पाणीपातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 13:22 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून, कोयनेची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे सोमवारी सकाळी पुन्हा एक फुटाने उचलून सात फुटांवर नेण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकोयनेचे दरवाजे आता सात फुटांवर, नदीच्या पाणीपातळीत वाढ नदीच्या पाणीपातळीत वाढ : पावसाचा जोर कमी; पूर्व भागात दडी कायम

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून, कोयनेची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे सोमवारी सकाळी पुन्हा एक फुटाने उचलून सात फुटांवर नेण्यात आले आहेत.

त्यामुळे सहा दरवाजे आणि पायथा वीजगृहातून ३२८०९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी नदीच्या पाणीपातळी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पूर्व दुष्काळी भागात पावसाची दडी कायम आहे.गेल्या २२ दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडू लागला आहे. या पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात पाणीसाठा वाढू लागला आहे. कोयना, कण्हेर, तारळी यासह मोठ्या धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे.

कोयना धरण परिसरात पाऊस सुरू असल्याने शनिवारी धरणाचे सहा दरवाजे पाच फुटांपर्यंत उचलण्यात आले होते. रविवारी दुपारी बाराला दरवाजे सहा फुटांपर्यंत उचलण्यात आले. तर सोमवारी सकाळी अकराला धरणाचे दरवाजे आणखी एका फुटाने उचलण्यात आले.

सध्या धरणाचे सहा दरवाजे सात फुटांवर असून, त्यातून ३०७०९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पायथा वीजगृहातूनही २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरणाच्या दरवाजातून विसर्ग वाढल्याने कोयना नदीची पाणीपातळी वाढ झाली आहे. आणखी विसर्ग वाढल्यास नदीला पूरपरिस्थती निर्माण होणार आहे. तर धरणात ८४.२४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.जिल्ह्यातील धोम वगळता इतर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कण्हेरमध्ये सोमवारी सकाळी ८.५८ टीएमसी साठा होता. धरणातून ३४९१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. बलकवडी धरणातही ३.४८ टीएमसी पाणीसाठा असून, १२०३ क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे.

तारळीतील साठा ५.११ टीएमसी असून, २५८१ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नीरा देवघर धरण परिसरात २६ मिलीमीटर पाऊस झाला असून, साठा ९.३० टीएमसी आहे. वीर धरणात ९.५६ टीएमसी पाणीसाठा असून, १३३६२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम ०३ (४७९)कोयना ५१ (३२५८)बलकवडी २९ (१७५७)कण्हेर ०२ (५६४)उरमोडी १२ (८४६)तारळी २१ (१५५२)

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर