शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा रुग्णालयास नव्या शंभर डॉक्टरांचा आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:47 IST

येत्या दोन वर्षांत ही परिस्थिती बदलणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी तब्बल शंभर डॉक्टरांना सिव्हिलमध्ये रुग्णांची सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे

ठळक मुद्दे हे सर्व डॉक्टर प्रशिक्षणार्थी जरी असले तरी त्यांना योग्य मार्गदर्शन त्यांचे वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर करतील.

दत्ता यादव ।सातारा : वैद्यकीय महाविद्यालयाला जिल्हा शासकीय रुग्णालय हस्तांतरित केल्यामुळे याचा फायदा रुग्णसेवेवरही होणार असून, नव्या दमाचे तब्बल शंभर डॉक्टर रुग्णांची सेवा करण्यासाठी हातभार लावणार आहेत. एवढेच नव्हे तर खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर काही वर्षांतच सिव्हिलमध्ये बायपास सर्जरीपासून एमआरआयपर्यंत शस्त्रक्रिया होतील. त्यामुळे साहजिकच खासगी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होणार आहे.

अपुºया सोयी सुविधा आणि डॉक्टरांच्या मनुष्यबळाअभावी जिल्हा शासकीय रुग्णालय नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतानाच हे रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरित करण्यात आले, त्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. हे रुग्णालय हस्तांतर झाल्यामुळे याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होणार आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये साडेचारशे कर्मचारी आहेत. त्यामध्ये केवळ ४५ डॉक्टर आहेत. मात्र, येत्या दोन वर्षांत ही परिस्थिती बदलणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी तब्बल शंभर डॉक्टरांना सिव्हिलमध्ये रुग्णांची सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे. हे सर्व डॉक्टर प्रशिक्षणार्थी जरी असले तरी त्यांना योग्य मार्गदर्शन त्यांचे वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर करतील.

तसेच पाच वर्षांनंतर ही डॉक्टरांची संख्या पाचशेच्या घरात जाणार आहे. त्यामुळे चोवीस तास रुग्णांना चांगल्या सुविधा मिळतील. डॉक्टरांच्या लवाजम्याबरोबरच अत्याधुनिक सामग्रीही उपलब्ध होणार आहे. सीटीस्कॅन मशीन, एक्सरे, सोनोग्राफी मशीनबरोबरच विविध शस्त्रक्रियांसाठी लागणाºया मशीनचा त्यामध्ये समावेश असेल. जिल्हा रुग्णालयात सध्या अ‍ॅपेंडिक्स, हर्निया, सिझर यासारख्या शस्त्रक्रिया होत आहेत. मात्र, आता एमआरआयपासून बायपास सर्जरीपर्यंत सर्वच शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. यामुळे खासगी रुग्णालयात होणारा लाखो रुपयांचा खर्चही वाचणार आहे. हृदयरोगावरील शस्त्रक्रिया खासगी हॉस्पिटलमध्ये कराव्या लागत असल्यामुळे सर्वसामान्य रुग्ण उपचाराविनाच दिवस कंठत होते. परंतु आता अशा रुग्णांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचा हक्काचा आधार मिळाला आहे.मंजूर न होण्यासाठी देव घातले पाण्यात!म्हणे साताºयात मेडिकल कॉलेज मंजूर होऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले होते. कॉलेज मंजूर झाले तर आमचे दवाखाने ओस पडतील, अशी भीतीही अनेकांना होती. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमित्ताने सर्वच सुविधा मोफत मिळणार असल्याने खासगी हॉस्पिटल चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.काय फायदे होणार..

अत्याधुनिक सामग्री .बायपास अन् एमआरआयची सुविधा .शंभर शिकाऊ डॉक्टरांची मदत.पाचशे खाटांचा समावेश. खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांचे प्रमाण घटणार. तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटल