शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सातारा जिल्हा होरपळतोय..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:29 IST

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून, सोमवारी जिल्ह्याचे तापमात ४०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. ...

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून, सोमवारी जिल्ह्याचे तापमात ४०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून पारा चाळीशी पार गेल्याने सातारकर पुरते हैराण झाले आहेत. रविवारी जिल्ह्याचे तापमान ४२.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले असून, ते आतापर्यंतचे उच्चांकी तापमान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे तापमान गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढले आहे. सरासरी चाळीस अंश सेल्सिअसचा पल्लाही पाऱ्याने ओलांडला आहे. सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असल्याने दुपारनंतर नागरिकांचे घराबाहेर पडणेही बंद झाले आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते व रहदारीची ठिकाणे दुपारच्या सुमारास ओस पडत आहेत.जिल्ह्याचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान रविवारी नोंदविण्यात आले. कमाल तापमानाची ४२.१ अंश तर किमान २६.६ अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली आहे. सोमवारी पारा दोन अंशांनी उतरून ४०.६ अंशांवर स्थिरावला. दुपारच्या वेळेस आकाशात ढग दाटून आल्याने उन्हाची दाहकता कमी जाणवली. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना वैशाख वणव्याची आठवण येत असून, उकाड्यामुळे रसवंतीगृह, आईस्क्रीमची दुकाने गर्दीने बहरून जात आहेत.डोळेच फक्त उघडे : कडक उन्हाच्या गरम झळा त्रास देत आहेत. श्वासोच्छवासातून गरम हवा गेल्याने डोके दुखणे, कोरडी सर्दी होण्याचे आजार जडत आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना जाणाºया तरुणी, शासकीय कार्यालये, दुकानांमध्ये काम करणाºया महिला घरातून बाहेर पडताना स्टोलने चेहरा झाकून घेत आहेत. केवळ डोळेच उघडे ठेवले जात आहेत. त्यामुळे काहीअंशी का होईना उन्हापासून बचाव करता येत असल्याचा या तरुणींचा अनुभव आहे. दुचाकीवरून जाणाºया महिलाही स्कार्पने तोंड झाकत आहेत. त्यामुळे उष्माघाताचा त्रासही जाणवत नाही.आईच्या पदरात लेकरूथंड वातावरणासाठी प्रसिद्ध असलेला कूल सातारा सध्या तापमानवाढीमुळं ‘हॉट’ बनला आहे. सरासरी ४१ अंशांवर तापमानाची नोंद होत असल्याने कडक उन्हामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या माउलीने आपल्या बाळालाही पदराखाली घेतले आहे.उष्माघात टाळण्यासाठी हे उपाय महत्त्वाचेसातारा : जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून, वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचे प्रमाणही वाढत आहे. उष्माघात झाल्यानंतर थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था आदी लक्षणे दिसून येतात. उष्माघात जीवावर बेतू नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. काही घरगुती उपाययोजना केल्यास उष्माघातापासून बचाव होऊ शकतो.उष्माघात होऊ नये, यासाठी वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे.कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावी.उष्णता शोषून घेणारे कपडे वापरावेत. काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नयेत. सैल, पांढºया रंगाचे कपडे वापरावेत.दिवसभरात जास्तीत-जास्त पाणी प्यावे. उन्हामध्ये काम करताना थोडी विश्रांती घ्यावी.उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम थांबवावे.उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, टोपी यांचा वापर करावा.उष्ण पदार्थ खाणे टाळावे, शक्यतो पहाटे व सायंकाळीच चालण्यासाठी घराबाहेर पडावे.