शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कण्हेरमधील विसर्ग वाढणार; वाईतील महिलेचा शोध सुरूच, ठोसेघर घाटात रस्ता खचला

By नितीन काळेल | Updated: July 26, 2024 22:26 IST

Satara Rain News: सातारा तालुक्यातील कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास धरणातून साडे सात हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- नितीन काळेलसातारा - सातारा तालुक्यातील कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास धरणातून साडे सात हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर वाई तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या महिलेचा शोध सुरूच होता. तर ठोसेघर घाटातही रस्ता खचल्याने एेकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सहा दिवसांपासून पाऊस पडत आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास पावसाचा जोर मंदावला होता. पण, दुपारपासून पुन्हा पाऊस वाढू लागला आहे. यामुळे प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले आहे. सातारा तालुक्यातील कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे धरणात येवा वाढला आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. रात्रीच्या सुमारास सुमारे साडे सात हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार होते. त्यामुळे वेण्णा नदीच्याही पाणीपातळीतही वाढ होणार आहे. परिणामी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर वाई येथील शिल्पा प्रकाश धनावडे या किवरा ओढ्यातील पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही त्यांचा शोध सुरू होता. स्थानिक ट्रेकर्स, पालिका आणि पोलिसांच्यावतीने शोध मोहीम सुरू होती. मात्र, सायंकाळपर्यंततरी त्यांचा शोध लागला नव्हता. तर संततधार पावसामुळे सातारा तालुक्यातील ठोसेघर घाटातही रस्ता खचला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून खचलेल्या रस्त्याच्या भागात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तसेच धोक्याची जाणीव व्हावी म्हणून वाहनधारकांसाठी फलकही लावण्यात आला आहे.

बोंडारवाडीत भूस्खलन; जलवाहिनी तुटलीजावळी तालुक्यातही जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे ओढ्यांना पूर आला आहे. तसेच बोंडारवाडी येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन सुरू झाले आहे. यामध्ये जलवाहिनी तुटली. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसfloodपूर