शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : बेकायदा खासगी सावकारी, पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 17:56 IST

बेकायदा खासगी सावकारी करत पिस्तुलाचा धाक दाखवून पैशांची मागणी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू नंदकुमार मोरे, तन्वीर शकूर शेख व गणेश मारुती निकम (रा. गोडोली, सातारा) अशी आरोपींची नावे आहेत.

ठळक मुद्देबेकायदा खासगी सावकारीपिस्तुलाचा धाक दाखवून खंडणीची मागणी

सातारा : बेकायदा खासगी सावकारी करत पिस्तुलाचा धाक दाखवून पैशांची मागणी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू नंदकुमार मोरे, तन्वीर शकूर शेख व गणेश मारुती निकम (रा. गोडोली, सातारा) अशी आरोपींची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, फिर्यादी रोहित सुरेश शेंडे (वय २८ रा. न्यू विकासनगर, सातारा) यांनी जून २०१५ मध्ये तन्वीर शेख याच्याकडून वाळू व्यवसायासाठी दहमहा २० टक्के व्याज दराने ५० हजार रुपये घेतले. त्याबदल्यात मोटारसायकल तारण ठेवली होती. त्यानंतर १२ दिवसांत मुद्दल, व्याज आणि दंडाची रक्कम अशी एकूण १ लाख रुपयांची परतफेड केली.

आॅक्टोबर २०१५ मध्ये राजू मोरे याच्याकडून १० टक्के व्याजाने ५ लाख रुपये घेतले. त्यापोटी मोरे व शेख यांनी ११ लाख ७० हजार रुपये जबरदस्तीने वसूल केले. त्यानंतर मार्च २०१६ रोजी रात्री आठ वाजता राजू मोरे, तन्वीर शेख व गणेश निकम यांनी घरात घुसून रोहित व त्याचे वडील सुरेश शेंडे यांना शिवीगाळ व मारहाण केली.

मोरे याने पिस्तुलाचा धाक दाखवून कुटुंबातील सर्वांना मारून टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पोरे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा