शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

Satara: सांगली जलसंपादाकडून सिचंनासाठी मागणी; कोयनेतून विसर्ग सुरू... 

By नितीन काळेल | Updated: August 27, 2023 12:12 IST

Satara: सातारा जिल्ह्याच्या बहुतांशी भागात दडी असून पश्चिकडेच उघडझाप सुरू आहे. त्यामुळे रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वलाच सर्वाधिक ४० मिलीमीटरची नोंद झाली.

- नितीन काळेल सातारा : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात दडी असून पश्चिकडेच उघडझाप सुरू आहे. त्यामुळे रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वलाच सर्वाधिक ४० मिलीमीटरची नोंद झाली. तर सांगली जलसंपदा विभागाकडून सिचंनासाठी मागणी झाल्याने कोयनेच्या पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण पाणीसाठा ८६ टीएमसीजवळ आहे.

पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले आहेत. तरीही यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिलेले आहे. पश्चिम भागात जेमतेम पाऊस झाला असलातरी पूर्वेकडे मात्र प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी पिके वाळून चालली आहेत. यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्याचबरोबर पश्चिम भागातच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी आणि कोयनासारखे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसी इतकी आहे. पावसाअभावी ही धरणेही भरलेली नाहीत. ८० टक्क्यांच्या आसपास या धरणात पाणीसाठा आहे. त्यातच आणखी काही दिवस पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे यंदा धरणे भरणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशातच अनेक भागातून धरणामधून सिंचनासाठी पाणी साेडण्याची मागणी होत आहे. यामुळे प्रमुख धरणे भरणे गरजेचे आहे.

रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला १३ तर नवजाला १६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरला ४० मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पाऊस नवाजालाच ४९२८ मिलीमीटर झालेला आहे. तर कोयना येथे ३४५८ आणि महाबळेश्वरला ४६४० मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ८५.७७ टीएमसी पाणीसाठा होता. तर धरणात ६२५९ क्यूसेक वेगाने पाणी येत होते.

सांगलीसाठी पायथा वीजगृहातून पाणी सोडले...सांगली जिल्हा सिंचन विभागाने कोयना धरण व्यवस्थापनाकडे सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यामुळे शनिवारी दुपारपासून कोयनेच्या पायथा वीजगृहातील एक युनीट सुरू करण्यात आले आहे. त्यातून १०५० क्यूसेक पाणी सांगलीसाठी सोडण्यात आलेले आहे. रविवारीही हा विसर्ग सुरूच होता.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसरWaterपाणी