शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : दीपक पवार उदयनराजेंना म्हणाले हॅपी बर्थडे, शत्रूचा शत्रू म्हणे आपला मित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:52 IST

आजपावेतो अनेक वर्षे एकमेकांना पाण्यात पाहणारी नेतेमंडळी जेव्हा हसतखेळत गप्पा मारू लागतात, शुभेच्छा देऊ लागतात... तेव्हा सर्वसामान्य जनतेला समजतं की कुछ तो गडबड है!

ठळक मुद्देदीपक पवार उदयनराजेंना म्हणाले हॅपी बड्डेशत्रूचा शत्रू म्हणे आपला मित्र नव्या राजकीय समीकरणामुळे सातारा-जावळीतील राजकरणाला कलाटणी!

नितीन काळेलसातारा : आजपावेतो अनेक वर्षे एकमेकांना पाण्यात पाहणारी नेतेमंडळी जेव्हा हसतखेळत गप्पा मारू लागतात, शुभेच्छा देऊ लागतात... तेव्हा सर्वसामान्य जनतेला समजतं की कुछ तो गडबड है!

 कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन हॅपी बर्थडे म्हटले. त्यामुळे ही राजकीय जवळीकता पाहता सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील राजकारणाला कलाटणी मिळणार असल्याचेच दिसत आहे.पूर्वी सातारा आणि जावळी हे वेगवेगळे विधानसभा मतदारसंघ होते. २००९ ला विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि सातारा-जावळी हा नवा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आतापर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

२०१४ च्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार हे उभे होते. त्यावेळी आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडल्या होत्या. तसे पाहता आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि दीपक पवार यांच्यात राजकीय शत्रुत्व कायम आहे.

आतापर्यंत खासदार उदयनराजे भोसले हे मनोमिलनामुळे शांत होते. त्यामुळे त्यांची ताकद ही शिवेंद्रसिंहराजेंना मिळत होती; पण २०१६ मध्ये नगरपालिका निवडणूक झाली. या निवडणुकीत सातारा पालिकेतील मनोमिलनाचा फुगा फुटला. त्यामुळे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात टोकाची दरी निर्माण झाली.

परिणामी राजकारणात कोण कोणाचा मित्र नसतो तसेच शत्रूही असत नाही, याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. कारण, विरोधक असणारे खासदार उदयनराजे आणि दीपक पवार हे एकत्र येत असल्याचे चित्र आहे. हे आगामी राजकीय चित्र बदलणार असल्याचे द्योतक आहे. 

छत्रपती असल्याने खासदार उदयनराजे भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यापूर्वीही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यामध्ये राजकारण काही नाही.- दीपक पवार,भाजप 

 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर