शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : एका तासात तयार केले ५२३८ सिड बॉल, नावीन्यपूर्ण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 13:31 IST

राजमाचीच्या दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत, गोपूज पाणी फाउंडेशन टीम यांनी गोपूजच्या जिल्हा परिषद शाळेत सिड बॉल तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत विद्यार्थी व पाणी फाउंडेशन टीम व कृषिदुतांनी मिळून एका तासात तब्बल ५२३८ सिड बॉल तयार केले.

ठळक मुद्देएका तासात तयार केले ५२३८ सिड बॉल, नावीन्यपूर्ण कार्यक्रम कृषिदूत, विद्यार्थी, पाणी फाउंडेशनचे संयुक्त प्रयत्न

औंध : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे लक्षात घेत तसेच वृक्षारोपणाची आवड भावी पिढीला निर्माण होण्याच्या उद्देशाने राजमाचीच्या दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत, गोपूज पाणी फाउंडेशन टीम यांनी गोपूजच्या जिल्हा परिषद शाळेत सिड बॉल तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत विद्यार्थी व पाणी फाउंडेशन टीम व कृषिदुतांनी मिळून एका तासात तब्बल ५२३८ सिड बॉल तयार केले.शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्या आसपास असणाऱ्या झाडांच्या बिया गोळा करून घेऊन येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थी व गावातील युवकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या बिया शनिवारी सकाळी शाळेत घेऊन आल्यानंतर शिक्षकांनी तसेच सूर्यभान जाधव, कृषिदूत अध्यक्ष विशाल खाडे, हृषिकेश टकले, यशराज पोमन, निखिल काळे, संदीप कोळेकर, विनोद कुमार, योगेश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना सिड बॉल बनविण्यासाठी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांचे समूह पाडून त्यांच्यात जास्तीतजास्त सिड बॉल बनविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली व त्याचबरोबर कृषिदूत, युवक यांनीही त्यांना मदत करत ५२३८ सिड बॉल तयार झाले.सिड बॉल तयार करताना माती आणि शेण समप्रमाणात घेऊन एकजीव करतात. त्यात सावली देणाऱ्या झाडांच्या बिया घालून गोळा तयार करतात. गोळ्यांना छोट्या बॉलसारखा आकार द्यायचा व सीड बॉल तयार झाल्यानंतर ते वाळवून ठेवतात.

प्रवासात जाताना तसेच जिथे डोंगर परिसर आहे तेथे हे बॉल्स टाकतात. नुसत्या बिया टाकल्या तर पक्षी, किडे, मुंग्या खाऊन टाकतील म्हणून सिड बॉल तयार करण्याचा उद्देश असतो. कृषिदूत, शिक्षक, विद्यार्थी, पाणी फाउंडेशन टीम यांनी केलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहेत.

निसर्गाचा समतोल राखला जावा, यासाठी शासनही नेहमी प्रयत्नशील असते. आतापर्यंत खड्डे तयार करून त्यात बिया किंवा रोपटे लावण्यात येत होते. गोपूज येथे चक्क बियांचा बॉलच तयार केला आहे. हे तयार झालेले सिड बॉल जुलै आणि आॅगस्टमध्ये गोपूज परिसरात पाणी फाउंडेशन टीममार्फत लावण्यात येणार आहेत. या सिड बॉलचा प्रयोग यशस्वी झाला तर गोपूजच्या नैसर्गिक सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. 

टॅग्स :environmentवातावरणSatara areaसातारा परिसर