शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : पहाटे थंडी, दुपारी उकाडा, फेब्रुवारीतच कमाल तापमान ३५ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:27 IST

गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील कमाल तापमानात सतत वाढ होत असून फेब्रुवारीतच ३५ अंशाचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे किमान तापमानात घट झाल्याने पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत आहे. सतत बदलत असणाऱ्या अशा वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकल्याने आजारी पडण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.

ठळक मुद्देपहाटे थंडी, दुपारी उकाडा, फेब्रुवारीतच कमाल तापमान ३५ अंशावरसतत बदलणाऱ्या वातावरणामुळे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक

सातारा : गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील कमाल तापमानात सतत वाढ होत असून फेब्रुवारीतच ३५ अंशाचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे किमान तापमानात घट झाल्याने पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत आहे. सतत बदलत असणाऱ्या अशा वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकल्याने आजारी पडण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात थंडी जाणवत आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून तर किमान तापमान ११ ते १५ अंशाच्या दरम्यान होते. तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान तापमान ९ अंशांपर्यंत खाली आले होते. हे तापमान दोन वर्षांतील निच्चांकी ठरले होते.

त्यानंतर संक्रातीच्या दरम्यान, किमान तापमानात तसेच कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचे चटके जाणवू लागले होते. जानेवारी महिन्यातच कमाल तापमान ३० अंशांच्यावर गेले व बरेच दिवस ते स्थिर होते.फेब्रुवारी महिन्यापासून तर किमान आणि कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली. कमाल तापमान ३० च्यावर जाऊ लागले. तर किमान तापमानात वाढ होऊन ते १८ अंशापर्यंत पोहोचले. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे.

किमान तापमान १५ अंशावरुन १७ अंशापर्यंत पोहोचले तसेच त्यात उतारही आला. सध्या साताऱ्यांतील किमान तापमान १७.०७ अंशावरुन १४.०७ पर्यंत खाली आले आहेत. तर दुसरीकडे कमाल तापमान ३३ अंशावरुन ३५ च्या पुढे गेले. त्यामुळे दिवसा उकाडा आणि पहाटे थंडी जाणवत आहे.

अशा सतत बदलत जाणाऱ्या वातावरणामुळे थंडी, ताप, खोकला अशा आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गावोगावच्या रुग्णालयातही उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.तापमान      किमान             कमालदि. २०              १५.०५    ३३.०८दि. २१             १६.००     ३४.०२दि. २२             १६.०१    ३३.०६दि. २३            १७.००       ३४.०१दि. २४           १७.०७       ३३.०६दि. २५            १५.०५         ३४.०२दि. २६            १३.०५     ३५.०१दि. २७            १४.०७ ..........

टॅग्स :TemperatureतापमानSatara areaसातारा परिसर