शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

थंड महाबळेश्वरपेक्षा सातारा ‘कूल’; हंगामातील निचांकी तापमान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 19:45 IST

गारठा कायम 

सातारा : जिल्ह्यातील किमान तापमान चार दिवसांपाूसन घसरले असून बुधवारी सातारा शहरात ११ तर महाबळेश्वरचा पारा १२.५ अंश नोंद झाला आहे. यामुळे थंड हवेच्या महाबळेश्वरपेक्षा सातारा ‘कूल’ ठरले आहे. तसेच जिल्ह्याच्या इतर भागातीलही किमान तापमान १२ ते १३ अंशाच्या दरम्यान कायम असल्याने थंडीचा जोर दिसून येत आहे.जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरूवात झाली. सुरूवातीला पारा १५ अंशापर्यंत खाली आला होता. त्यानंतर किमान तापमानात मोठ्या प्रमाणात उतार आला. मागील चार-पाच दिवसांपासून तर पारा सतत खाली येत गेला. यामुळे गारठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्यातच हवेत शीत लहर असल्याने दुपारी ही थंडी जाणवत आहे. यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भाग अधिक थंड झाला आहे. मंगळवारी महाबळेश्वरमध्ये १० अंशाची तर सातारा शहरात १०.६ अंश तापमानाची नोंद झालेली. हे या हंगामातील निचांकी तापमान ठरले. पण, बुधवारी किमान तापमानात वाढ झाली. सातारा शहराचा पारा ११ अंशावर गेला. तर महाबळेश्वरचा पारा अडीच अंशाने वाढला. त्यामुळे बुधवारी महाबळेश्वरला १२.५ अंश किमान तापमान नोंद झाले. तरीही जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या आणि थंड हवेच्या महाबळेश्वरपेक्षा सातारा शहर अधिक थंड असल्याचे दिसून आले. सातारा शहराबरोबरच परिसरातही गारठा कायम असल्याने माॅर्निंग वाॅकसाठी जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. सकाळी सात नंतरच अधिक करुन नागरिक घराबाहेर पडत आहेत. तर थंडीमुळे शहरात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. रात्री नऊ नंतर आणि पहाटेच्या सुमारास शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातच थंडीत वाढ झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरीवर्ग दुपारच्या सुमारास शेतातील कामे उरकून घेत आहेत. तर विजेच्या वेळापत्रकाप्रमाणे शेतकरी रात्रीही पिकांना पाणी देण्याची मोटारी सुरू करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.सातारा शहरातील किमान तापमान..दि. ५ नोव्हेंबर १८.५, ६ नोव्हेंबर १८.५, ७ नोव्हेंबर १८.७, ८ नोव्हेंबर १७.१, ९ नोव्हेंबर १४.५, १० नोव्हेंबर १३.६, ११ नोव्हेंबर १३.५, १२ नोव्हेंबर १५, १३ नोव्हेंबर १५, १४ नोव्हेंबर १४.४, १५ नोव्हेंबर १२, १६ नोव्हेंबर १२.१, १७ नोव्हेंबर ११.९, १८ नोव्हेंबर १०.६ आणि १९ नोव्हेंबर ११

English
हिंदी सारांश
Web Title : Satara 'Cooler' Than Mahabaleshwar; Season's Lowest Temperature Recorded

Web Summary : Satara recorded a lower temperature than Mahabaleshwar. The minimum temperature in Satara city was 11 degrees Celsius, while Mahabaleshwar recorded 12.5 degrees. The cold weather impacted daily life and agriculture in the district. Night bonfires are common.