शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : अधिकाऱ्यांच्या निवासस्थानामध्ये गिरवणार मुले शिक्षणाचे धडे, पोलिसांमध्ये कुतूहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 15:14 IST

गेल्या पन्नास वर्षांपासून अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या पोलीस मुख्यालयासमोरील इमारतीमध्ये आता पोलिसांची मुले शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. या इमारतीमध्ये चौथी ते पाचवी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू होत असून, यामध्ये फक्त पोलिसांच्या मुलांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या निवासस्थानामध्ये गिरवणार मुले शिक्षणाचे धडेपोलिसांमध्ये कुतूहल : रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात

सातारा : गेल्या पन्नास वर्षांपासून अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या पोलीस मुख्यालयासमोरील इमारतीमध्ये आता पोलिसांची मुले शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. या इमारतीमध्ये चौथी ते पाचवी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू होत असून, यामध्ये फक्त पोलिसांच्या मुलांनाच प्रवेश दिला जाणार आहे.पोलीस मुख्यालयासमोर ब्रिटीशकालीन इमारत आहे. या इमारतीमध्ये इग्रजांच्या काळात राखीव पोलीस अधिकारी वास्तव्य करत असत. ही परंपरा पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतरही सुरूच राहिली. ती आजतागायत होती. पोलीस मुख्यालयासमोरून जाता-येता ही टुमदार इमारत सगळ्यांचे लक्ष वेधून घेते.

या इमारतीमध्ये वास्तव करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ असायची. मात्र, कालांतराने अधिकाऱ्यांना शासकीय वसाहती वास्तव्यासाठी उपलब्ध झाल्याने ही ब्रिटीशकालीन इमारत ओस पडत चालली होती. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या पडीक इमारतीचा चांगला उपयोग करण्याचा निर्णय घेतला.या इमारतीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलासांठी शाळा सुरू करण्याचा विचारविनमय झाल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली. सध्या या इमारतीला रंगरंगोटीचे काम सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचे रुपडे शाळेमध्ये रुपांतरीत करण्यासाठी रात्रंदिवस कर्मचारी या इमारतीमध्ये सध्या काम करत आहेत.

मुलांना बसण्यासाठी व्हरांडा, पाण्याची सोय, तसेच खेळण्यासाठी अंगण अशाप्रकारच्या सुविधा तयार केल्या जात आहेत. खाकी वर्दी आणि अधिकाऱ्यांच्या कामाची पद्धत मुलांनी शाळेत येता-जाता जरी पाहिली तरी त्यांना यातून आपणही मोठे अधिकारी व्हावे, ही प्रेरणा त्यांच्यामध्ये जागृत होईल, हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून अधिकाऱ्यांच्या इमारतीमध्ये शाळा सुरू करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्यांने लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSchoolशाळा