शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:17 IST

सातारा जिल्ह्यात शुक्रवार (दि. ६) व शनिवार (दि. ७) असा सलग दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. उन्हाळ्याच्या झळा असह्य होत असताना पावसाच्या शक्यतेमुळे गारवा निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यतापावसाच्या शक्यतेमुळे गारवा निर्माण होणार

सातारा : सातारा जिल्ह्यात शुक्रवार (दि. ६) व शनिवार (दि. ७) असा सलग दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. उन्हाळ्याच्या झळा असह्य होत असताना पावसाच्या शक्यतेमुळे गारवा निर्माण होणार आहे.

साताऱ्यासह कोल्हापूर, सांगली, सोलापूर व पुणे या जिल्ह्यांतही गारांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभरा या हंगामी पिकांची काढणी व इतर सर्व कामे जवळपास पूर्णत्वाला गेली आहेत.शेतकऱ्यांकडून चाऱ्याच्या गंजी लावण्याची कामे ठिकठिकाणी सुरू आहेत. बहुतांश गावांत यात्रा सुरू आहेत. या पावसामुळे चाऱ्यांच्या गंजी भिजण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगून चाऱ्यांच्या गंजी झाकण्याची गरज भासणार आहे.

गारा व विजा कोसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. ज्या गावांत यात्रा सुरू आहेत, तिथेही पळापळ होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची चिन्हे निर्माण झाली आहे.दरम्यान, जलयुक्त शिवार व पाणी फाउंडेशन तसेच लोकसहभागातून ज्या गावांत पाणी साठवणूक तलावांची निर्मिती करण्यात आली आहे, तिथे पाऊस झाल्यास त्याचा फायदाच होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस