शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : रयतेला शहाणं करणाऱ्या संस्थेचा शतक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 16:02 IST

तळागाळातील मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करून देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ आॅक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीला सुरू केलेली रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. या संस्थेतून तब्बल साडेचार लाख विद्यार्थी ज्ञान घेत आहेत.

ठळक मुद्देरयतेला शहाणं करणाऱ्या संस्थेचा शतक महोत्सवअण्णांनी लावलेल्या शिक्षणरूपी रोपट्याचा वटवृक्ष

सातारा : तळागाळातील मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करून देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ आॅक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीला सुरू केलेली रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. या संस्थेतून तब्बल साडेचार लाख विद्यार्थी ज्ञान घेत आहेत.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड  तालुक्यातील काले येथे केली. १९१९ मध्ये अण्णांनी लावलेल्या शिक्षणरूपी रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे.

महाराष्ट्रातील १५ जिल्हे अन् कर्नाटकातील एका जिल्ह्यातून अशी ४२ महाविद्यालये, ४३८ हायस्कूल, ९१ वसतिगृहे, १६० उच्च माध्यमिक विद्यालये, १७ शेती महाविद्यालये, पाच तंत्र विद्यालये, पाच इंग्रजी माध्यमाच्या शाळा, आठ अध्यापक महाविद्यालये, ४५ प्राथमिक व पूर्व महाविद्यालये, आठ आश्रमशाळा तर ५८ आयटीआय अशा ७३७ शाखा तयार झाल्या आहेत.

त्यातून साडेचार लाख विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जाते. या ठिकाणी १३, ५५३ कर्मचारी कार्यरत आहेत. भव्यदिव्य विस्तार झालेल्या रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था समजली जाते. साताºयातील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयास नुकताच स्वायत्ता मिळाली आहे. बोधी वृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांनीही रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह म्हणून वटवृक्षाची निवड केली.स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीदस्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य घेऊन सुरू झालेल्या रयत शिक्षण संस्थेत कमवा आणि शिकामधून हजारो विद्यार्थी धडे घेत आहेत. रयत शिक्षण संस्थेचा अनेक विद्यापीठांनी आदर्श घेतला आहे. 

शतकाच्या वाटचालीत रयत परिवार मोठा झाला आहे. भविष्यात चिकित्सक व संशोधन वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होण्यासाठी रयत प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी तंत्रस्नेही शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात येईल.- अनिल पाटील, चेअरमन, रयत शिक्षण संस्था

टॅग्स :Rayat Educational Instituteरयत शिक्षण संस्थाSatara areaसातारा परिसरPrakash Javadekarप्रकाश जावडेकर