शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : कार झाडावर धडकून अव्वल कारकून ठार; दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 16:28 IST

चिपळूण-पंढरपूर राज्यमार्गावर शुक्रवारी दुपारी पाटण तालुक्यातील सनगरवाडी चालकाचा ताबा सुटल्याने कार राज्यमार्गालगतच्या वडाच्या झाडाला धडकली. या अपघातात पाटण तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून ठार तर आणखी एक अव्वल कारकून व मरळीचे मंडलाधिकारी असे दोनजण गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देकार झाडावर धडकून अव्वल कारकून ठार; दोन जखमीमैलाचा दगड उडवून राज्यमार्गालगत असलेल्या वडाच्या झाडाला धडक

उंब्रज (सातारा) : चिपळूण-पंढरपूर राज्यमार्गावर शुक्रवारी दुपारी पाटण तालुक्यातील सनगरवाडी चालकाचा ताबा सुटल्याने कार राज्यमार्गालगतच्या वडाच्या झाडाला धडकली. या अपघातात पाटण तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून ठार तर आणखी एक अव्वल कारकून व मरळीचे मंडलाधिकारी असे दोनजण गंभीर जखमी झाले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मरळीचे मंडलाधिकारी जगन्नाथ भगवान जांबळे (वय ४६) हे कार (एम एच ०९ बीएम ४४५५) चालवत होते. राज्यमार्गावर सनगरवाडी हद्दीत कार आल्यानंतर त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. कारने उजव्या बाजूचा मैलाचा दगड उडवून राज्यमार्गालगत असलेल्या वडाच्या झाडाला धडक दिली.

या अपघातात गाडीत असलेल्या दोन्ही एअर बॅग्जच्या उघडलेल्या. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांना तातडीने उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. दरम्यान उपचारापूर्वीच पाटण तहसीलदार कार्यालयाचे अव्वल कारकून शिलेवंत गणपत कणसे (५६, रा. गडकर आळी, सातारा. मूळगाव बनपुरी, ता. खटाव) हे ठार झाले. तर मरळीचे मंडलाधिकारी जगन्नाथ भगवान जांबळे (४६, रा. शाहूपुरी सातारा) पाटण तहसीलदार कचेरीतील अव्वल कारकून राजेंद्र रंगराव खरात (४१, रा. रेवडी ता. सातारा) हे गंभीर जखमी झाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात