शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Satara Bus Accident: बसमध्ये चेष्टा-मस्करी सुरू होती अन् होत्याचं नव्हतं झालं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 15:12 IST

Satara Bus Accident: दैव बलवत्तर म्हणूनच या बसमधील प्रकाश सावंत-देसाई बचावले आहेत. त्यांनी सांगितलेलं अपघाताचं कारण अधिकच अस्वस्थ करणारं आहे.

पोलादपूर/सातारा: महाबळेश्वरला पावसाळी सहलीसाठी निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी मिनी बस पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात ६०० फूट खोल कोसळल्यानं ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. दैव बलवत्तर म्हणूनच या बसमधील प्रकाश सावंत-देसाई बचावले आहेत. त्यांनी सांगितलेलं अपघाताचं कारण अधिकच अस्वस्थ करणारं आहे. ड्रायव्हरनं केवळ क्षणभरासाठी मागे पाहिलं आणि कुणाला काही कळायच्या आत बस दरीत गेली, होत्याचं नव्हतं झालं.  

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी दरवर्षी लावणी वगैरे झाल्यानंतर पिकनिकला जातात. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ड्रायव्हरसह ३४ जण वर्षासहलीला निघाले होते. दोन दिवस धम्माल करण्यासाठी सगळेच उत्सुक होते. त्यांनी ग्रूप फोटो काढला आणि बस महाबळेश्वरच्या दिशेनं रवाना झाली. परंतु, नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. 

बसमध्ये सगळेजण एन्जॉय करत होते. चेष्टा-मस्करी करत करत प्रवास सुरू होता. तेव्हा, बस चालकाने सहज मागे बघितलं आणि बस रस्ता सोडून मातीवर गेली. त्यावेळी ड्रायव्हरने ब्रेक लावले, पण मातीवरून घसरत जाऊन बस दरीत कोसळली, असं प्रकाश यांनी सांगितलं. 

(Inputs: वार्ताहर प्रकाश कदम)

असे बचावले प्रकाश सावंत-देसाई

प्रकाश सावंत-देसाई हे कृषी विद्यापीठात साहायक अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. बस दरीत जात असताना प्रकाश दारातून बाहेर फेकले गेले. झाडाच्या आधाराने ते बचावले आणि नंतर फांद्यांना धरूनच साधारण अर्ध्या तासात रस्त्यावर पोहोचले. घाटातील वाहनांना अडवून त्यांनी अपघाताची माहिती दिली आणि कृषी विद्यापीठातील वरिष्ठांनाही घडलेली घटना सांगितली. त्यानंतर वेगाने सूत्रं हलली आणि स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकं वेगानं घटनास्थळी पोहोचली. 

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बघ अपघातAccidentअपघातMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान