शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : बिचुुकलेच्या जवानाने वाचविले पाच अधिकाऱ्यांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 13:06 IST

देशाला अभिमान वाटावा, अशी धाडसी कामगिरी कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे राहणाऱ्या व केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या विशाल गोरख पवार या जवानाने केली आहे. श्रीनगरमधील नव्हाटा या ठिकाणी अतिरेकी संघटनांना मदत करणाऱ्या जमावाने विशाल पवार यांच्या गाडीवर दगडफेक केली.

ठळक मुद्दे बिचुुकलेच्या जवानाने वाचविले पाच अधिकाऱ्यांचे प्राणश्रीनगरमध्ये झाली होती गाडीवर दगडफेक

वाठार स्टेशन (सातारा) : देशाला अभिमान वाटावा, अशी धाडसी कामगिरी कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे राहणाऱ्या व केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या विशाल गोरख पवार या जवानाने केली आहे.

श्रीनगरमधील नव्हाटा या ठिकाणी अतिरेकी संघटनांना मदत करणाऱ्या जमावाने विशाल पवार यांच्या गाडीवर दगडफेक केली. यावेळी प्रसंगावधान दाखवून गाडीत बसलेल्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह एकूण पाचजणांची जवान विशाल पवार यांनी सुखरूप सुटका केली.विशाल पवार हे केंद्रीय राखीव पोलीस दलात चालक पदावर कार्यरत आहेत. सध्या ते श्रीनगर या संवेदनशील ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. दि. २ जून रोजी विशाल पवार हे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एमआर गंज या ठिकाणाहून नव्हाटा शहरातून कॅम्पकडे निघाले होते. या शहरातील एका चौकात येताच अतिरेक्यांना मदत करणाऱ्या सुमारे पाचशेहून अधिक नागरिकांच्या जमावाने त्यांच्या गाडीवर दगडाचा मारा सुरू केला.

विशाल पवार यांनी प्रसंगावधान दाखवत आपली गाडी हळूहळू बाहेर काढली. मात्र ही गाडी खाँजा बाजार चौकात येताच गर्दी अजूनच वाढली. यामुळे या गर्दीतून वाट काढण्यासाठी त्यांना दोन मिनिटे गाडी उभी करावी लागली. यावेळी जमावातील काही लोकांनी यागाडीचा दरवाजा उघडला आणि अधिकऱ्यांना गाडीतून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला.परंतु गाडीत पाठीमागे बसलेल्या जवानाने दरवाजा बंद करण्यात यश मिळवले. यावेळी विशाल पवार यांचे या सर्व बाबींवर लक्ष होते. त्यामुळे ते आपली गाडी हळूहळू पुढे घेत होते. अखेर मोठ्या धाडसाने त्यांनी आपली गाडी जमावातून बाहेर काढून आपल्या सहकाऱ्यांना कॅम्पपर्यंत सुखरूप पोहोचविले. त्यांच्या या कामगिरीचे सातारा जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJammu Kashmirजम्मू-काश्मीर