शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : प्र नंतर शासकीयही पडण्याच्या बेतात, प्रशासकीय इमारतीकडे दुर्लक्ष, स्वच्छतेचे तीन-तेरा; पाण्याचाही तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 18:40 IST

सातारा येथील प्रशासकीय इमारतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत असून, या टोलेजंग इमारतीच्या नावातील ह्यप्रह्ण पडून केवळ शासकीय हे अक्षर उरले आहे. स्टीलमधील ही अक्षरे गंजून पडत आहेत, आता उरलेले शासकीय ही अक्षरेही पडण्याच्या बेतात आहेत.

ठळक मुद्देस्टीलमधील अक्षरे गंजून पडत आहेतआता उरलेले शासकीय अक्षरेही पडण्याच्या बेतात सैन्य भरतीनंतर अस्वच्छतेचे साम्राज्य

सातारा : येथील प्रशासकीय इमारतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत असून, या टोलेजंग इमारतीच्या नावातील प्र पडून केवळ शासकीय हे अक्षर उरले आहे. स्टीलमधील ही अक्षरे गंजून पडत आहेत, आता उरलेले शासकीय ही अक्षरेही पडण्याच्या बेतात आहेत.

इमारतीला सुरुवातीच्या काळात केलेली रंगरंगोटी आता फिकी पडलेली आहे. त्यातच इमारतीच्या दर्शनी भागात लावलेली स्टीलची अक्षरेही गंजून पडू लागली आहेत. प्रशासकीय इमारत असे या दर्शनी भागाच्या इमारतीवर लिहिण्यात आले होते. यातील प्र  हे अक्षर केव्हाच पडून गेले आहे.

उरलेली शासकीय ही अक्षरेही गंजू लागल्याचे दिसते. त्याकडे दुर्लक्ष केले गेल्यास ती अक्षरेही पडून जाण्याची शक्यता असून, भविष्यात ही इमारत शासकीय की खासगी? हे ओळखणेही अवघड होण्याची दाट शक्यता आहे.ही इमारत जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वांच्याच दुर्लक्षाचे धनी बनले आहे. इमारतीतील लिफ्ट कधी सुरू होते, तर अनेकदा ती बंदस्थितीत पाहायला मिळते. चार मजल्यांच्या इमारतीवर विविध शासकीय कार्यालये आहेत. साहजिकच कामानिमित्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांना पायऱ्या चढूनच वर जावे लागते.

अपंगांचे हाल होताना पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला इमारतीत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. पाण्याची वारंवार टंचाई होत असल्याने स्वच्छतागृहे अस्वच्छ राहून दुर्गंधी पसरताना पाहायला मिळते.जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, आत्मा, जिल्हा माहिती अधिकारी, सीआयडी, जिल्हा वाहतूक शाखा, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, महिला व बालकल्याण विभाग अशी शासकीय कार्यालये या इमारतीत आहेत. शेकडो लोक कामानिमित्त कार्यालयात येत असतात. इमारतीचा परिसरही अस्वच्छ बनला आहे.सैन्य भरतीनंतर अस्वच्छतेचे साम्राज्यसातारा शहरात पोलिस परेड मैदानावर नुकतीच भरती प्रक्रिया पार पडली. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो युवक आले होते. त्यांनी आणलेल्या साहित्याच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, यांचा खच या इमारतीत पडलेला दिसतो. त्यामुळे येथे स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार