शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : आईच्या सुश्रुषेसाठी गावी आलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 12:49 IST

सातारा-सज्जनगड रस्त्यावर पोगरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या जीपने धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला तर दुसरा एकजण जखमी झाला. विकास चंद्रकांत जाधव असे मृताचे नाव असून, गावी तो आजारी आईची सेवा करण्यासाठी आला होता.

ठळक मुद्देआईच्या सुश्रुषेसाठी गावी आलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यूदुसरा एकजण जखमी सातारा-सज्जनगड रस्त्यावर जीपची दुचाकीला धडक

सातारा : सातारा-सज्जनगड रस्त्यावर पोगरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या जीपने धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला तर दुसरा एकजण जखमी झाला. विकास चंद्रकांत जाधव असे मृताचे नाव असून, गावी तो आजारी आईची सेवा करण्यासाठी आला होता.याबाबत समजलेली माहिती अशी की, कुरूण, ता. सातारा येथील विकास जाधव (वय ३२) हा मुंबईत कामाला आहे. गावी असणाऱ्या आईच्या सेवेसाठी १५ दिवसांपूर्वी तो आला होता. बुधवारी रात्रीच्या सुमारास साताऱ्यातून तो गावातीलच मित्राबरोबर दुचाकीवरून परतत होता.

यादरम्यान, सातारा-सज्जनगड रस्त्यावरील पोगरवाडी फाट्यानजीक समोरून आलेल्या जीपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरुन पडून विकास जाधव हा गंभीर जखमी झाला.

त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच ठार झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला प्रदीप बाबूराव देशमुख (२५) हा जखमी झाला. जखमी प्रदीपवर जिल्हा रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.मुंबईला जाण्यापूर्वी काळाचा घाला...वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबप्रमुख म्हणून विकासवर सर्वांचीच जबाबदारी आली होती. उदरनिर्वाहासाठी मुंबईला जाऊन तो नोकरी करत असलातरी त्याचे लक्ष गावाकडे आई आणि लहान भावांवर होते. त्यासाठी तो वारंवार गावी यायचा.

गेल्या आठवड्यात आई आजारी असल्याने व लग्नासाठी मुली पाहायच्या म्हणून तो सुटी घेऊन गावी आला होता. आईचे आॅपरेशन झाल्याने शनिवारी तो मुंबईला जाणार होता. तर बुधवारी रात्री तो एका भावाला मुंबईला सोडण्यासाठी सातारा येथे आला होता. त्यावेळी तेथून येताना प्रदीप देशमुखबरोबर तो दुचाकीवरून गावी येत असताना हा अपघात झाला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात