शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

सातारा : औंधमधून २७ पोती प्लास्टिक कचरा जमा, शिवसंकल्प प्रतिष्ठानचा उपक्रम, यमाई देवी मंदीर अन् श्री भवानी वस्तूसंग्रहालय परिसर चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:51 AM

औंध (सातारा) : येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या सभासदांनी येथील मूळपीठ डोंगर परिसर व श्री भवानी वस्तू संग्रहालय परिसराची स्वच्छता करून सुमारे २७ पोती साठलेला प्लास्टीक कचरा जमा केला. श्री यमाईदेवी यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक तसेच मूळपीठ डोंगरावरील श्री यमाईदेवी दर्शन आणि श्री भवानी संग्रहालय पाहण्यासाठी पर्यटकांची बारमाही गर्दी असते.मूळपीठ डोंगरावरील दोन ते ...

ठळक मुद्देऔंधमधून २७ पोती प्लास्टिक कचरा गोळा शिवसंकल्प प्रतिष्ठानचा उपक्रमयमाई देवी मंदीर अन् श्री भवानी वस्तूसंग्रहालय परिसर चकाचक

औंध (सातारा) : येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या सभासदांनी येथील मूळपीठ डोंगर परिसर व श्री भवानी वस्तू संग्रहालय परिसराची स्वच्छता करून सुमारे २७ पोती साठलेला प्लास्टीक कचरा जमा केला. श्री यमाईदेवी यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक तसेच मूळपीठ डोंगरावरील श्री यमाईदेवी दर्शन आणि श्री भवानी संग्रहालय पाहण्यासाठी पर्यटकांची बारमाही गर्दी असते.

मूळपीठ डोंगरावरील दोन ते तीन किलोमीटर परिघातील क्षेत्रामध्ये प्लास्टिक पिशव्या व अन्य प्रकारचा कचरा साठला असतो. यामुळे निसर्गाची हानी होते.

परिसरही अस्वच्छ झाला आहे. हे लक्षात आल्यानंतर येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या सभासदांनी संपूर्ण डोंगर परिसर पिंजून काढून सुमारे सतावीस पोती प्लास्टिक कचरा जमा केला.

प्रतिष्ठानकडून औंध आणि परिसरात दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवली जाते. औंध व परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी यापुढील काळात जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबविणार असल्याची माहिती अध्यक्ष निलेश खैरमोडे यांनी दिली.

दोन दिवस राबविण्यात आलेल्या मोहिमेत अभिमन्यू माने, विजय भोसले, सागर गोसावी, अंकुश शर्मा, श्रीपाद सुतार, शिवराज दंडवते, राहुल लाड, अवधूत गुरव, भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असलेले अभिजित जाधव व दिपक जाधव, सूरज सावंत तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यासामाजिक उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत असून यामुळे मूळपीठ डोंगर परिसर स्वच्छ झाला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसर