शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे साताऱ्याचे शिलेदार शशिकांत शिंदेच; सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शनात अर्ज भरणार 

By नितीन काळेल | Updated: April 10, 2024 10:47 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून साताऱ्यातून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना उतरवले आहे. यामुळे 'लोकमत'चे वृत्त खरे ठरले आहे.

- नितीन काळेल सातारा  - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून साताऱ्यातून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना उतरवले आहे. यामुळे 'लोकमत'चे वृत्त खरे ठरले आहे. तर सोमवार दि. १५ एप्रिल रोजी शिंदे हे मोठ्या शक्ती प्रदर्शनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार आहेत.

महाविकास आघाडीत पूर्वीपासूनच सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटाकडे आहे. पण या मतदारसंघाचा उमेदवार ठरवताना शरद पवार यांना वेळ लागला आहे. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणावरून माघार घेतली. त्यामुळे निवडणूक लढवणार कोण हा प्रश्न होता. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात येऊन बैठक घेतली. तसेच उमेदवारासंदर्भात चाचणी केली. या घडामोडीतील चर्चेनंतर माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे नाव अग्रभागी होते. त्यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार हे ' लोकमत ' ने दोन दिवसापूर्वीच वृत्त दिले होते. हे वृत्त आता खरे ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी सकाळी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये साताऱ्यातून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना उतरवले आहे. 

साताऱ्याचा उमेदवारीचा तिढा सुटला आहे. आता दि. १५ एप्रिल रोजी माजी मंत्री शिंदे हे साताऱ्यात उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि इंडिया आघाडीतील नेते उपस्थित राहणार आहेत. 

शशिकांत शिंदेच का ? सातारा जिल्हा हा शरद पवार यांच्या पाठीशी नेहमीच भक्कमपणे उभा राहिला. १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर साताऱ्यानेच पवार यांना मोठे बळ दिले.  तेव्हापासून राष्ट्रवादीचा सातारा हा बालेकिल्ला ठरला. त्याचवेळी शशिकांत शिंदे हे तत्कालीन जावळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून प्रथम निवडून आले. २००९  मध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर शरद पवार यांनी शिंदे यांना कोरेगावमधून उतरवले. दोनवेळी ते कोरेगावचे आमदार झाले. आघाडी सरकारच्या काळात त्यांना शरद पवार यांनी पालकमंत्रीही केले. शरद पवार यांचे विश्वासू अन् आक्रमक चेहरा म्हणून त्यांना पाहिले जाते. आज जिल्ह्यातील शरद पवार गटाची भक्कम बाजू तेच सांभाळत आहेत. राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर जिल्ह्यात पक्ष पुढे न्यायचं असेल तर आक्रमक चेहरा व विश्वासू नेता हे नेतृत्व गुण पाहून शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Shashikant Shindeशशिकांत शिंदेSharad Pawarशरद पवारsatara-pcसाताराmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४