शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अबब..सासनकाठी डोक्यावर घेऊन उचलली जमिनीवरील पैशाची नोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 13:54 IST

कोपर्डे हवेली येथील सिध्दनाथ देवाचे पुजारी कृष्णत गुरव यांनी म्हसवड येथील नागोबा मंदिरात सिध्दनाथ देवाची सासनकाठी डोक्यावर घेऊन शिंग वाजवत जमिनीवर ठेवलेली पैशाची नोट जिभेवर घेऊन कौशल्याने उचलली.

शंकर पोळकोपर्डे हवेली : धार्मिक कार्यक्रमामध्ये सासनकाठीला महत्व आहे. यात्रेमध्ये सासनकाठीवर श्रध्देने चांगभलच्या गजरात भाविक गुलाल खोबऱ्यांची उधळण करतात. त्यावळी हौसेने अनेक भाविक उंचच्या उंच सासनकाठी नाचवत असतात. ही सासनकाठी नाचवण आणि ती सांभाळण म्हणजे जिकरीचेच. मात्र, कोपर्डे हवेली येथील सिध्दनाथ देवाचे पुजारी कृष्णत गुरव यांनी म्हसवड येथील नागोबा मंदिरात सिध्दनाथ देवाची सासनकाठी डोक्यावर घेऊन शिंग वाजवत जमिनीवर ठेवलेली पैशाची नोट जिभेवर घेऊन कौशल्याने उचलली.म्हसवडच्या यात्रेसाठी प्रत्येक वर्षी कोपर्डे हवेलीची सिध्दनाथ देवाची सासनकाठी रथाला भेटण्यासाठी जात असते. या सासनकाठीला रथाला भेटण्याचा मान आहे. म्हसवडच्या रथोत्सवासाठी सासनकाठीबरोबर पायी भाविक चालत जातात. म्हासुर्णे, कुकडवाड असे दोन मुक्काम असतात. यंदाच्या यात्रेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोगोबा मंदिर येथे मुक्काम होता.सासन काठीची उंची चाळीस फूटसासन काठीची उंची चाळीस फूट असून ती वजनाने जाड आहे. काठीला चार तोरण्या, पोशाख, फरारा, वणगायच्या शेपटाच्या केसाचा गोंडा, काठी नाचवण्यासाठी लाकडी बसणे असते. त्यावर मुर्ती सिध्दनाथ देवाची मूर्ती आहे. ही सासनकाठी ठिकठिकाणी नाचवण्यात येते. ताल येण्यासाठी हालगी वाजवली जाते. त्या ठेक्यावर सासनकाठी नाचते काही भाविक खाद्यावर घेऊन नाचतात तर काही डोक्यावर घेऊन नाचवतात.म्हसवड आणि नागोबा मंदिर हे दोन किलोमीटरचे अंतर आहे. कृष्णत पुजारी यांनी नागोबाच्या मुक्कामी शिंग वाजवत हालगीच्या ठेक्यावर ताल धरत जमिनीवर ठेवलेली पैशाची नोट जिभेवर घेऊन कौशल्याने उचलली. यावेळी सिध्दनाथ देवाचे पुजारी महादेव गुरव, दत्ता गुरव, बारा बलुतेदार तसेच ग्रामस्थ, भाविक, उपस्थित होते.सासनकाठी नाचविण्यासाठी ताकतीपेक्षा कौशल्याची गरजअनेक गावांत यात्रेच्यावेळी सासनकाट्या भाविक नाचवत असतात. या काठ्या कमी जास्त उंचीच्या असतात. त्याला नवसाच्या नारळाचे तोरण बांधले जाते. काठीचा तोल सांभाळण्यासाठी तोरण्या असतात. काठी नाचवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ती नाचविण्यासाठी ताकतीपेक्षा कौशल्य असावे लागते.

सासनकाटी नाचवत असताना मनाची एकाग्रता आणि कौशल्याची गरज असते. त्यासाठी तोरण्या धरणाऱ्यांचीही साथ असावी लागते. तरच ती नाचवता येते. ताकदीपेक्षा कौशल्य महत्त्वाचे आहे. - कृष्णत गुरव, कोपर्डे हवेली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर