शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sarara: रुग्णवाहिकेसह तरुणाचा मृतदेह पोलिस मुख्यालयासमोर आणला, पांगारेतील ग्रामस्थ आक्रमक

By दत्ता यादव | Updated: July 16, 2023 15:48 IST

Satara: खुनी हल्ल्यात मृत्युमुखी पावलेल्या पांगारे, ता. सातारा येथील राहुल शिवाजी पवार (वय ३०) या तरुणाचा मृतदेह ग्रामस्थांनी रविवारी दुपारी एक वाजता रुग्णवाहिकेसह पोलिस मुख्यालयासमोर आणला.

- दत्ता यादवसातारा  - खुनी हल्ल्यात मृत्युमुखी पावलेल्या पांगारे, ता. सातारा येथील राहुल शिवाजी पवार (वय ३०) या तरुणाचा मृतदेह ग्रामस्थांनी रविवारी दुपारी एक वाजता रुग्णवाहिकेसह पोलिस मुख्यालयासमोर आणला. त्यामुळे मुख्यालयासमोर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फरारी असलेल्या सात आरोपींना अटक करा, अशी आक्रमक मागणी करत ग्रामस्थांनी यावेळी घोषणाबाजीही केली. दरम्यान, पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ठेवलेली रुग्णवाहिका पांगारेकडे मार्गस्थ झाली.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यामध्ये परळी खोऱ्यात पांगारे आणि राजापुरी ही दोन गावे शेजारी-शेजारी आहेत. ५ मे २०२३ रोजी एका अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीवरून वाद झाला. राजापुरी गावातील तीसहून अधिक तरुण हातात काठ्या, लोखंडी राॅड घेऊन मध्यरात्री पांगारेत पोहोचले. त्यावेळी राहुल पवार आणि नयन पवार यांच्या घरावर जमावाने हल्ला केला. राहुलला घराबाहेर बोलावून त्यांनी पोटात लाथा मारल्या. यामध्ये राहुल गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने पुणे येथे नेण्यात आले.

मात्र, दोनमहिने उपचाराला प्रतिसाद दिल्यानंतर शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर पांगारे ग्रामस्थांनी पुणे येथे धाव घेतली. दरम्यान, रविवारी सकाळी राहुलचा मृतदेह रुग्णवाहिकेतून पोलिस मुख्यालयासमोर आणण्यात आला. यावेळी पांगारे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहुलवर हल्ला करणाऱ्यांमध्ये पोलिस व राजकारण्यांची मुले आहेत. त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करावे, अशी मागणी ग्रामस्थ करत होते. सातारा शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव आक्रमक होत आरोपींना अटक झाल्याशिवाय इथून जाणार नाही, अशी भूमिका घेत होता. परंतु पोलिस निरीक्षक शहा आणि फडतरे यांनी अत्यंत संयमाने जमावाला कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. या प्रकरणात जी नावे समोर येतील, त्यातील कोणाचीही गय केली जाणार नाही, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर रुग्णवाहिका पांगारेकडे रवाना झाली.

जलद कृती दलाचा बंदोबस्त...मुख्यालयासमोर मृतदेहासह रुग्णवाहिका आणल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जलद कृती दलाचे जवानही मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तैनात करण्यात आले होते. याशिवाय सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारीही मोठ्या संख्येने हजर होते.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी